: मध्य प्रदेशातील भोपाळच्या शाहपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ वर्षीय मुलीवर झालेल्या बलात्काराच्या आरोपांखाली पोलिसांनी २३ वर्षीय तरुणाला मंगळवारी अटक केली. युवराज कुमार असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर शाहपुरा ए सेक्टरमधून त्याला अटक केली.

पोलिसांच्या माहितीनुसार, तरुणाची चार-पाच दिवसांपूर्वी पीडित मुलीसोबत ओळख झाली होती. तरुणाने मंगळवारी मुलीला बोलावले. त्यानंतर रिक्षातून शाहपुरा सेक्टर ए येथील आपल्या घरी नेले. तेथे तरुणाने तिच्यावर केला. घटनेनंतर मुलीला प्रचंड मानसिक धक्का बसला होता.

पीडित मुलीने शौकत नावाच्या तरुणाला फोन करून मदत मागितली. त्यानंतर तो तिथे पोहोचला. मुलगी शाहपुरा तलावाजवळ रडत बसली होती. आम्ही आरोपी तरुणाला तेथे बोलावून घेतले. तेथे आल्यानंतर तो मुलीच्या हाताला धरून घेऊन जात होता. त्यावर आम्ही त्याला रोखले आणि पोलिसांच्या हवाली केले, असे शौकतने सांगितले.

वरिष्ठ पोलीस अधीक्षक राजेश भदौरिया यांनी सांगितले की, आरोपी तरुणाला अटक केली आहे. तो बिहारचा राहणारा आहे. युवराज असे त्याचे नाव आहे. या घटनेचा तपास करत आहोत. तरुणाची आणि पीडित मुलीची ओळख डेटिंग अॅपच्या माध्यमातून झाली होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here