‘घर घर से बाहर निकलो, कोहराम मचा दो, मोदी तेरी राख कर देंगे. मोदीजी तुम खत्म हो जाओगे’, अशी वक्तव्ये अबु आझमी यांनी मुंबईतील आपल्या भाषणात केल्याचे भातखळकर यांनी पत्रात लिहिले आहे. अबु आझमी यांची ही चिथावणीखोर वक्तव्ये आहेत. यामागील बोलविता धनी कोण आहे, हे शोधून काढायला हवे, असेही भातखळकर यांनी पत्रात म्हटले आहे.
केंद्र सरकारने आणलेले तीन केंद्रीय कृषी कायदे हे देशाच्या कृषी क्षेत्रात क्रांतीकारी बदल आणण्यासाठी केंद्राने आणलेले आहेत. असे असले तरी देखील काही राजकीय पक्ष आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी देशातील शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. इतकेच नाही, तर ते त्यांची माथी देखील भडकवत आहेत असा आरोप भातखळकर यांनी पत्रातून केला आहे. मुंबईतील आझाद मैदानात याच पार्श्वभूमीवर २५ जानेवारीला शेतकरी आंदोलन घेण्यात आले. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आदि नेते उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना सप नेते अबु आसिम आझमी यांनी संबोधित केले. त्यावेळी त्यांनी भडकाऊ वक्तव्ये केली आहेत. घराबाहेर पडा आणि गोंधळ घाला असे आवाहन त्यावेळी अबु आझमी यांनी लोकांना केले, असे भातखळकर यांनी पुढे पत्रात लिहिले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
आपल्या भाषणात आझमींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्ये देखील केली असल्याचे भातखळकर यांनी नमूद केले आहे. आझमी यांनी केलेल्या भाषणाच्या दुसऱ्याच दिवशी, म्हणजेच २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शेतकरी आंदोलनाच्या आडून गोंधळ माजवण्यात आला. त्यामुळे अबू आझमी यांची चौकशी करणे गरजेचे आहे, असे अतुल भातखळकर यांनी आपल्या पत्रात अधोरेखित केले आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times