पोलिसांनी अटक केल्यानंतर त्या १८ वर्ष तुरुंगात होत्या. या बाबत माहिती मिळताच पोलिसांनी या प्रकरणात अधिक चौकशी सुरु केली. सर्व कागदपत्र व सरकारी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अखेर प्रजासत्ताक दिनी हसीना बेगम भारतात पुन्हा परतल्या आहेत.
पोलीस आणि कुटुंबाकडून स्वागत
हसीना बेगम भारतात परतल्यानंतर त्यांच्या कुटुंबानं आणि पोलिसांनीही त्यांचं जंगी स्वागत केलं आहे. तसंच, भारतात परतल्यावर मला स्वर्गात आल्यासारखं वाटतंय, अशी भावूक प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे. मला पाकिस्तानात जबरदस्ती अटक करण्यात आली. तिथं मला खूप वाईट अनुभव आले, असं नमूद करतानाच त्यांनी औरंगाबाद पोलिसांचे आभार मानले आहेत. तसंच, हसीना बेगम यांचे नातेवाईक जैनुद्दीन चिश्ती यांनीही औरंगाबाद पोलिसांचे आभार मानले आहेत.
वाचाः
पाकिस्तानच्या न्यायालयात हसीना बेगम यांनी त्या निर्दोष असल्याचा दावा केला होता. त्यानंतर न्यायलयानं या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पाकिस्तानी यंत्रणांनी भारतातील पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क केला. त्यावेळी पाक अधिकाऱ्यांना हसीना बेगम यांचं घर औरंगाबादमधील रशिदपुरा परिसरात असल्याची माहिती मिळाली. तसंच, हे घराची नोंदणी हसीना बेगम यांच्या नावावर असल्याचीही खात्री झाली.
वाचाः
सर्व पुरावे आणि खातरजमा झाल्यानंतर पाकिस्ताननं एका आठवड्यापुर्वी त्यांची तुरुंगातून सुटका केली. तसंच, सर्व सरकारी प्रक्रिया आणि कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर प्रजासत्ताक दिनी त्यांना भारतीय अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times