मुंबईः गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु असून शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढणार असल्याचंही स्पष्ट केलं होतं. हा मोर्चा दिल्लीत आला तेव्हा लाल किल्ल्याच्या दिशेनं ट्रॅक्टर रॅली गेली. तेव्हा पोलिसांनीच त्यांना लाल किल्ल्याचा मार्ग दाखवला, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते यांनी केला आहे.

प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चाला काल हिंसक वळण लागले. आंदोलक व पोलिसांमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली. त्यात मोठ्या संख्येने पोलीस व आंदोलक जखमी झाले. या हिंसाचाराचे देशभर पडसाद उमटत आहेत. महाराष्ट्रातही यावरुन राजकारण रंगले आहे.

दिल्लीतील हिंसा हा शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा भाजपचा सुनियोजित कट होता. गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. शेतकरी ट्रॅक्टर मोर्चा काढणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. हा मोर्चा दिल्लीत आल्यानंतर त्यांनी लाल किल्ल्यावर ध्वज फडकवला, पण तिरंगा काढून त्यांनी ध्वज फडकवला ही खोट आहे, असंही नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.

वाचाः

पोलिसांनीच त्यांना लाल किल्ल्याचा मार्ग दाखवला होता, असं नमूद करतच भाजपशी संबंधित दिप सिद्धुने तिथं ध्वज फडवला असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. तसंच, दीप सिद्धुनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती, असाही आरोप त्यांनी केला आहे.

वाचाः

दरम्यान, दिल्लीत घडलेल्या हिंसाचारानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. यावर नवाब मलिक यांनी शरद पवार हे जवानांच्या बाजूने उभे आहेत. दिल्ली पोलीस दलात पंजाब, हरियाणाचे लोक आहेत, हे आशिष शेलार यांना माहीत नाही काय?, असा सवाल केला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here