मुंबईः महाराष्ट्रात आज २ हजार १७१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर, गेल्या २४ तासांत ३२ करोना बाधित रुग्णांनी जीव गमावला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट सध्या ९५. २६ टक्के इतका झाला आहे. ()

राज्यात नवीन करोना बाधितांची संख्या झपाट्याने खाली येत असतानाच आता राज्यातील मृत्यूंचा आकडाही खाली येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने करोना बाधितांच्या संख्येत घट होत आहे. तर, राज्याचा रिकव्हरी रेट वाढला आहे. त्यामुळं आरोग्य प्रशासनाच्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे. आज राज्यात ३२ जणांनी करोनामुळं प्राण गमावले आहेत. त्यामुळं राज्यातील एकूण करोना मृतांचा आकडा ५० हजार ८९४ इतका झाला आहे. त्यामुळं सध्या राज्यातील मृत्यूदर २.५३% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,४३,६७,०९४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,१५,५२४ (१४.०३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

वाचाः

रुग्ण बरे होण्याचा प्रमाणही राज्यात वाढत आहे. आज राज्यात २ हजार ५५६ रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. इतक्या मोठ्या संख्येनं रुग्ण बरे झाल्यानं आजपर्यंत एकूण १९ लाख २० हजार ००६ इतके रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.२६% एवढे झाले आहे. सध्या राज्यात २,००,१५९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,६१५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

वाचाः

अॅक्टिव्ह रुग्ण
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्यांही वेगानं खाली येत आहे. सध्या राज्यात ४३ हजार ३९३ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुंबईतील सक्रीय रुग्णदेखील आता कमी होत आहेत. सध्या मुंबईत फक्त ५ हजार ६४५ इतके रुग्ण आहेत. तर, पुण्यात सर्वाधिक १२ हजार ६९२ इतक्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here