म. टा. प्रतिनिधी, सांगली

प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे शेतकरी आंदोलनात झालेल्या हिंसेचा रयत क्रांती संघटना आणि भाजपच्या वतीने इस्लामपूरमध्ये (जि. सांगली) निषेध करण्यात आला. आमदार () यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. आंदोलनाच्या निमित्ताने दिल्लीत हिंसा घडवणा-यांना बेड्या ठोकाव्यात, अशी मागणी यावेळी आमदार खोत आणि () यांनी केली. यासह इतरही काही मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मंगळवारी या आंदोलनाला हिंसक वळण लागले. पोलिसांचा विरोध झुगारून काही शेतकऱ्यांनी दिल्लीच्या रस्त्यांवर गोंधळ घातला. भाजप आणि रयत क्रांती संघटनेने शेतकऱ्यांच्या हिंसक आंदोलनाच्या निषेधार्थ बुधवारी ठिकठिकाणी आंदोलन केले. रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

यावेळी बोलताना आमदार खोत म्हणाले, ‘दिल्लीतील आंदोलन शेतकऱ्यांचे नसून देशाचे तुकडे पाडू इच्छिणाऱ्या दहशतवाद्यांचे आहे. दिल्लीत घुसून दहशत माजवणाऱ्या दहशतवाद्यांमुळे आंदोलनाचा खरा चेहरा समोर आला आहे. आंदोलनात हिंसा घडवणा-यांना केंद्र सरकारने तातडीने बेड्या ठोकाव्यात.

क्लिक करा आणि वाचा-

आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत केंद्र सरकारने नवे कृषी कायदे मागे घेऊ नयेत. दिल्लीतील आंदोलन शेतकऱ्यांच्या हितासाठी नसून, मोदी सरकारच्या विरोधात आहे. केंद्र सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कडक कारवाई करावी. हिंसक आंदोलनामागे डावे पक्ष आणि काँग्रेसचा सहभाग असल्याची शक्यता नाकारता येत नाही.’ यावेळी मोर्चात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here