कोहलीचे बरेच चाहते आहेत. पण कोहली एका ऑनलाइन रमी गेमचा सदिच्छादूत आहे. या गेमचे व्यसन तरुण पिढीला लागलेले आहे आणि त्यामध्ये त्यांनी बरेच पैसे गमावले आहेत. त्यामुळे या गेमविरोधात आणि त्याचे प्रमोशन करणाऱ्या व्यक्तींविरोधात केरळ उच्च न्यालयात याचिका दाखल करण्यात आली होती. केरळ उच्च न्यायालयाने या याचिकेची गंभीर दखल घेतली असून आता विराट कोहलीसह अभिनेत्री तमन्ना भाटीया आणि अभिनेता अजू वर्गीस यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.
युवा पिढी ही भारतातील सेलिब्रेटींची चाहती असते. ते ज्या गोष्टी सार्वजनिकपणे दाखवतात, त्या गोष्टी युवा पिढी करण्याचा प्रयत्न करत असते. या गेमममध्ये युवा पिढीतील बऱ्याच जणांनी पैसे गमावले आहेत, तर काही जणांवर जीव गमावण्याची वेळही आली आहे. त्यामुळे हा गेम थांबवण्यात यावा, याबाबत केरळच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
त्रिशूर येथील रहिवासी असलेल्या पाऊली वडक्कन यांनी याबाबत केरळच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यामध्ये त्यांनी म्हटले होते की,” या ऑनलाईन गेमममध्ये देशातील बऱ्याच लोकांनी पैसे गमावले आहेत, त्याचबरोबर काही जणांचा यामुळे जीवही गेला आहे. २७ वर्षीय विनित या युवकाने या गेमममध्ये तब्बल २१ लाख रुपये गमावले, त्यानंतर त्याने आत्महत्या केली. त्यामुळे हा गेम बंद करण्यात यावा, अशी याचिका मी उच्च न्यायालयात केली होती.”
या ऑनलाइन गेममध्ये ३२ वर्षीय सजेश यानेही मोठी रक्कम गमावली आहे. याबाबत सजेश म्हणाला की, ” याप्रकरणी उच्च न्यायालयाने केलेला हस्तक्षेत योग्य आहे आणि मी या निर्णयाचे स्वागत करतो. कारण मी अशा बऱ्याच व्यक्तींना ओळखतो की, ज्यांनी या गेममध्ये मोठी रक्कम गमावली आहे. मी स्वत: या ऑनलाइन गेममध्ये सहा लाख रुपये हरलेलो आहे. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणाची घेतलेली दखल योग्यच आहे.”
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times