‘विमानतळावर जाण्यासाठी मी आज दिल्ली मेट्रोने प्रवास केला. रस्तेमार्गाच्या तुलनेत मी अतिशय कमी वेळेत मेट्रोने विमानतळावर पोहोचलो. महाविकास आघाडीने कारशेडच्या विषयावर घातलेला गोंधळ पाहता मी असाच मुंबईत मेट्रो-३ ने मी विमानतळावर कधी जाऊ शकेल माहीत नाही.’, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
सत्यजीत तांबे यांनी दिले उत्तर
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो कारशेडवरून महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलेले पाहून काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे यांनी फडणवीस यांना लगेचच उत्तर दिले आहे. ते म्हणाले, ‘ प्रिय देवेंद्रभाऊ, तुमच्या माहितीसाठी सांगतो. ज्या दिल्ली मेट्रोतून आपण दिल्लीत प्रवास केलात तो प्रकल्प दिल्लीतील काँग्रेसच्या सरकारने पूर्ण केला. त्याच प्रमाणे मुंबई मेट्रो प्रकल्प देखील काँग्रेसच्याच कार्यकाळात सुरू करण्यात आला. कृपया सकारात्मक राहा. आम्ही मुंबई मेट्रोचे सर्व टप्पे मार्गी लावू.’
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना मेट्रो-३ मार्गिकेच्या आरे कारशेडचा मुद्दा गाजला होता. ही कारशेडसाठी उभारण्यासाठी आरेतील झाडांची रातोरात कत्तल करण्यात आली होती. त्यानंतर पर्यावरण प्रेमींनी या विरोधात आवाज उठवून आंदोलन छेडले होते. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर आरेतील कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
क्लिक करा आणि वाचा-
मात्र, कांजूरमार्ग येथील जागा मिठागाराची असल्याचे केंद्र सरकारने सांगितल्यानंतर हा वाद न्यायालयात गेला होता. त्यानंतर हायकोर्टाने कांजूरमार्ग येथील कारशेडचे काम थांबवण्यात यावे असे आदेश दिले होते. आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे सरकार कारशेडसाठी पर्यायी जागेचा शोध घेत आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times