वाचा:
खासदार व एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांच्याबद्दल भाजपच्या वेबसाइटवर आक्षेपार्ह उल्लेख असल्याचा स्क्रीनशॉट जोडत पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी एक ट्वीट केलं आहे. भाजपची अधिकृत वेबसाइट कोण चालवतं? त्यात महाराष्ट्रातील खासदार रक्षा खडसे यांच्यासोबतच गे समुदायाचाही अवमान करण्यात आला आहे, असे चतुर्वेदी यांनी ट्वीटमध्ये नमूद केले आहे. त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांना या ट्वीटमध्ये टॅग केले आहे. याच ट्वीटच्या आधारे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक ट्वीट करून हा प्रकार गंभीर असल्याचे म्हटले आहे.
वाचा:
‘भाजपच्या अधिकृत वेबसाइटवर महाराष्ट्रातील भाजप खासदार रक्षा खडसे यांचे असे अपमानजनक वर्णन पाहून मला धक्का बसला आहे. अशा प्रकारे महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही. भाजपने संबंधित दोषींवर तत्काळ कार्यवाही करावी, अन्यथा महाराष्ट्र सायबर पुढील कारवाई करेल’, असे अनिल देशमुख यांनी ट्वीटरच्या माध्यमातून बजावले आहे.
वाचा:
गुगल भाषांतरामुळे गोंधळ!
प्रत्यक्षात याबाबत खातरजमा केली असता हा भाषांतराचा गोंधळ असल्याचे दिसत आहे. भाजपच्या अधिकृत वेबसाइटवर सर्व खासदारांची यादी आहे. वेबसाइटवर इंग्रजी आणि हिंदी असे पर्याय आहेत. हिंदीचा पर्याय निवडल्यानंतर खासदारांच्या यादीत रक्षा खडसे यांचा उल्लेख योग्यच असल्याचे दिसत आहे. श्रीमती रक्षा खडसे, (महाराष्ट्र) असे कॅप्शन रक्षा यांच्या फोटोला देण्यात आले आहे. तर Raver या इंग्रजी शब्दाचे गुगल ट्रान्स्लेटमध्ये जाऊन भाषांतर केले असता होमोसेक्सुअल असा अर्थ सांगितला जात आहे. त्यामुळे या भाषांतरातूनच हा सारा गोंधळ झाल्याचे दिसत आहे.
वाचा:
भाजपच्या अधिकृत वेबसाइटवर रक्षा खडसे यांचा उल्लेख योग्य असल्याचे आढळते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times