नवी मुंबई: राज्य सरकारने वाहन विमा काढणे हे काम खासगी कंपन्यांकडे न सोपवता सरकारनेच पुढाकार घेऊन राज्यात (Vehicle Insurance Scheme) सुरू करावी आणि या शासकीय वाहन विमा योजनेला (Balasaneb Thackeray) हे नाव देण्यात यावे अशी मागणी नवी मुंबईतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) (Uddhav Thackeray) यांच्याकडे केली आहे. ही मागणी मान्य झाल्यासअशी योजना सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य ठरेल असेही मागणी करताना मनसेने म्हटले आहे. (launch balasaheb thackeray demands )

दिवसेंदिवस गाड्या वापरण्यांची संख्या झपाट्याने वाढत असून त्या प्रमाणात रस्ते अपघाताचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. अपघातांमुळे वाहनाचे नुकसान आणि अपघातग्रस्त व्यक्तीचा उपचाराचा खर्च मिळून मोठा आर्थिक फटका व्यक्तीला बसतो. यावर वाहन विमा हा आर्थिकदृष्ट्या अत्यंत उपयुक्त ठरतो. मोटार वाहन अधिनियम १९८८च्या कलम १४६ आणि कलम १४७ अन्वये मोटार वाहन विमा असणे आवश्यक आहे. या अधिनियमांतर्गत योग्य विमा संरक्षण नसलेले वाहन चालवणे बेजबाबदार कृत्य आहे. शिवाय शासकीय वाहन विमा सुरू केल्यास सर्वसामान्य नागरिकांना त्याचा चांगला फायदा तर होईलच, परंतु शासनाला देखील या योजनेचा फायदा मिळेल, असे मनसेचे नवी मुंबईतील शाखाप्रमुख यशवंत खिलारी यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करताना म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा-
अशी योजना सुरू झाल्यास महाराष्ट्र हे स्वत:ची वाहन विमा सुरू करणारे पहिले राज्य ठरेल. शिवाय वाहन विमा सर्वसामान्यांना योग्य दरात उपलब्ध होईल. शिवाय विमा कंपन्यांकडून होणारी फसवणूकही टळेल. त्याच प्रमाणे या योजनेतून महाराष्ट्र शासनाला आर्थिक पाठबळही मिळू शकेल, असे खिलारी यांनी म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here