मुंबई: राज्यात बुधवारी ठेवण्यात आलेल्या लक्ष्याच्या ७७ टक्के लसीकरणाची नोंद झाली. या मध्ये गडचिरोली जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजेच तब्बल १२६ टक्के इतके झाले. त्या खालोखाल सातारा, धुळे, जालना, बुलढाणा आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये देखील १०० टक्क्यांहून अदिक लसीकरण झाल्याची नोंद झाली आहे.

राज्यात काल बुधवारी ५३८ केंद्रांवर ४१ हजार ४७० आरोग्य कर्मचाऱ्यांना लस टोचण्यात आली. मुंबईत मात्र पुन्हा लसीकरणाच्या संख्येत घट नोंदवण्यात आली आहे. मुंबईत बुधवारी ठेवण्यात आलेल्या लक्ष्याच्या ६८ टक्के इतके लसीकरण झाले. मुंबईत आत्तापर्यंत २३ हजार ३९९ इतके लसीकरण झाले आहे. तर, राज्यात १ लाख ७८ हजार ३७१ कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

क्लिक करा आणि वाचा बातमी-

२१९ जणांना दिली गेली कोव्हॅक्सिन लस

भारत बायोटेकने तयार केलेली ‘कोव्हॅक्सिन’ ही लस राज्यातील एकूण सहा ठिकाणी देण्यात येत आहे. मात्र, अद्यापही या लसीकरणाला अल्प प्रतिसाद मिळत आहे. काल बुधवारी अमरावती जिल्ह्यात एकूण १०० जणांना ही लस देण्यात आली. तर पुणे येथे १७ जणांना, मुंबईत १८ जणांना, नागपूरमध्ये ४० जणाना, सोलापुरात ७ आणि औरंगाबादमध्ये ३७ जणांना कोव्हॅक्सिन ही लस देण्यात आली. म्हणजे बुधवारी राज्यात एकूण २१९ जणांना ही लस देण्यात आली.

क्लिक करा आणि वाचा बातमी- क्लिक करा आणि वाचा बातमी-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here