मुंबई: मुंबईकर गेल्या चार दिवसांपासून गुलाबी थंडीचा अनुभव घेत असून सलग तिसऱ्या दिवशी मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात घट () झाल्याची नोंद झाली आहे. तुलनेने उपनगरातील पारा अधिक घसरला असून उपनगरातील किमान १५.३ अंश इतके नोंदविण्यात आले. ( in the suburbs was 15 3 degrees)

गेल्या आठवडयात मुंबईत कमाल तापमान ३० अंशाच्या आसपास आणि किमान तापमान २० अंशांपेक्षा अधिक नोंदले जात होते. मात्र सोमवारपासून त्यामध्ये घट व्हायला सुरुवात झाली. मुंबईकर गेल्या ४ दिवसांपासून ही घट अनुभवच आहे. उपनगरातील सांताक्रुझ केंद्रावर बुधवारी १५.३ अंश इतके तापमान नोंदवले गेले. तर, मुंबईतील कुलाबा केंद्रावर १८ अंश किमान तापमान होते. उपनगरात अनेक ठिकाणी किमान तापमानात घट नोंदवली गेली. येत्या काही दिवस तापमानातील घट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यात पुढील ३-४ दिवस जाणवणार गारवा

उत्तर भारतात थंडीची लाट आल्याने महाराष्ट्रातील काही भागांमध्ये रात्रीच्या किमान तापमानात काही प्रमाणात घट झाली आहे. असे असले तरी राज्यात अजूनही कडाक्याची थंडी पडलेली नाही. पुढील तीन ते चार दिवस राज्यात काही प्रमाणात गारवा कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

कोकण विभागातील सर्वच जिल्ह्यांमध्ये किमान तापमान सरासरीच्या खाली घसरले आहे. मध्य महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी अजूनही किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक आहे. याला जळगाव अपवाद आहे. असे असले मध्य महाराष्ट्रात रात्री काहीसा गारवा जाणवत आहे. विदर्भ आणि मराठवाडयातील तापमान मात्र सरासरीच्या आसपास जाणवत आहे.

क्लिक करा आणि वाचा-

मुंबईच्या प्रदूषणात वाढ

मुंबई शहर आणि उपनगरांत दोन्ही ठिकाणी प्रदूषणात वाढ होत असल्याचे दिसत आहे. मुंबईत सर्वाधिक प्रदूषण कुलाबा येथे आढळल्याची नोंद सफरने (सिस्टिम ऑफ एअर क्वालिटी अ‍ॅण्ड वेदर फोरकास्टिंग अ‍ॅण्ड रिसर्च) केली आहे. कुलाब्यात प्रदूषक घटकाचे (पीएम २.५) प्रमाण ३४८ इतके होते. मुंबईत एकीकडे थंडी पडत असताना, दुसरीकडे कोरडी हवा आणि आर्द्रता आहे. यासोबतच मोठ्या प्रमाणात सुरू असलेली बांधकामे आणि वाढत्या वाहनांद्वारे होणाऱ्या प्रदूषणामुळे मुंबईतील हवेचा स्तर घसरत चालला आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here