आई-वडील तीन मुलींसह घरातून बेपत्ता
लाल किल्ल्यावर झेंडा लावणारा आपला नातू जुगराज सिंग होता. आमचे कुटुंब सीमेजवळ असलेल्या तारेच्या कुंपणाजवळ शेती करतं. आपल्या कुटुंबातील कोणताही सदस्य कोणत्याही असमाजिक कार्यात सामील झालेला नाही, असं जुगराज सिंगचे आजोबा माहिल सिंग आणि आजी गुरचरण कौर यांनी सांगितलं.
जुगराज गावातील गुरुद्वारामध्ये निशान साहिब येथे चोला साहिबची सेवा करतो. गावात सहा गुरुद्वारा साहिब आहेत. जेव्हा जेव्हा चोला साहिब निशान साहिबवर अर्पण करायचे तेव्हा जुगराज सिंग हे काम करायचा. त्याने दिल्लीतील लाल किल्ल्यावर झेंडा फडकावला असावा, असं त्याची आजी गुरचरण कौर म्हणाल्या.
जुगराज निशान साहिबवर चोला साहिब अर्पण करण्यात माहिर
त्याच्या या कृत्याने गावकरीही चकित झाले आहेत. जुगराज सिंग हा मॅट्रिक पास आहे. २४ जानेवारीला खेड्यातील दोन ट्रॅक्टर ट्रॉली शेतकरी आंदोलनासाठी दिल्लीकडे रवाना झाल्या. त्यांच्याबरोबर जुगराज सिंगही दिल्लीला गेला. २६ जानेवारीला टीव्हीवरील बातमी पाहून आम्ही चकीत झालो. लाल किल्ल्यावर झेंडा लावणारा तरुण हा जुगराज सिंग होता. तो आमच्या गावचा आहे, असं गावातील प्रेम सिंग म्हणाले.
पोलिसांनी कुटुंबीयांची चौकशी केली
२६ जानेवारीला रात्री १० वाजता पोलिसांची पथक जुगराज सिंगच्या घरी पोहोचली आणि कुटुंबीयांची चौकशी केली. चौकशी दरम्यान जुगराज सिंगचे वडील बलदेव सिंग यांनी त्यांचा मुलगा शेतकरी आंदोलनात दिल्लीला गेल्याचं सांगतिलं. अडीच वर्षांपूर्वी तो चेन्नईस्थित एका खासगी कंपनीत नोकरीसाठी गेला होता. पण पाच महिन्यांनंतर तो परतला. यानंतर शेतीचे काम सुरू झाले.
दिल्ली पोलिस या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. हे प्रकरण कट्टरतााद्यांशी संबंधित असू शकतं. हे प्रकरण खलिस्तान आंदोलनाशी संबंधित तर नाही ना, याचा तपासही केला जात आहे, असं एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times