‘काँग्रेसने हिंसाचार करणाऱ्यांची घेतली बाजू’
सर्व तथ्य सर्वांसमोर आहे. एकीकडे शेतकरी नेत्यांनी चिथावणी दिली, दुसरीकडे कॉंग्रेसचे नेते आणि युवा कॉंग्रेसने हिंसाचार करणाऱ्यांना योग्य ठरवले. एका गटाने तर लाल किल्ला जिंकण्याचा संदेश दिला होता. ट्रॅक्टर पलटी झाल्यामुळे एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. पण पोलिसांनी त्याला गोळ्या घालून ठार मारल्याचं ट्विट करून काँग्रेसने आगीत तेल ओतलं, असं जावडेकर म्हणाले.
‘सीएए दरम्यानही काँग्रेसने तेच केले’
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील आंदोलना वेळी कॉंग्रेस नेत्यांनी हेच केले. त्यानंतर दिल्लीत दंगल उसळली आणि अनेकांनी जीव गमवला. कॉंग्रेसला आपली चूक लक्षात घ्यायला हवी. पण ती सरकार आणि पोलिसांवर दोषारोप करत आहे. पोलिसांनी आश्चर्यकारक संयम दाखवला. पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीमार करावा, अशी कॉंग्रेसची इच्छा होती का? असा सवाल जावडेकरांनी केला.
‘शेतकर्यांशी चर्चा सुरू’
शेतकऱ्यांशी चर्चा सुरू आहे. सरकार शेतकऱ्यांशी अत्यंत संवेदनशीलतेने संवाद साधत आहे. शेतकर्यांसमोर दीड वर्ष हा कायदा स्थगित करण्याचा प्रस्ताव दिला होता, असं त्यांनी सांगितलं.
‘तोडगा निघून नये, अशी काहींची इच्छा आहे’
कॉंग्रेससह काही पक्षांना तोडगा नको आहे. जेव्हाही शेतकऱ्याशी चर्चा करण्यासंबंधी जेव्हाही निर्णय घेण्यात येईल, त्यांची माहिती योग्य वेळी दिली जाईल, असं त्यांनी सांगितलं.
ट्रॅक्टर परेडमधील हिंसाचाराला केंद्रीय गृहमंत्री अमित शह जबाबदार असल्याचा आरोप, काँग्रेसने केला आहे.
‘राहुल सतत चिथावणी देत होते’
कॉंग्रेसने जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना चिथावले. फक्त पाठिंबा देत नाहीए तर चिथावणीही देत होते. सीएएबरोबरही त्यांनी तेच केले. त्यांनी त्यांना रस्त्यावर येण्यास उद्युक्त केले आणि दुसर्या दिवसापासून रस्त्यावर आंदोलन सुरू झालं, असं म्हणत जावडेकरांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर पलटवार केला. तसंच शेतकऱ्यांना चिथावणाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी केली.
‘काँग्रेस हताश आणि निराश’
कॉंग्रेस हतबल आणि निराश झाली आहे. निवडणुकीत पराभूत झाली. डाव्यांचीही अशीच अवस्था आहे. म्हणूनच ते पश्चिम बंगालमध्ये नवीन मित्र शोधत आहोत. कॉंग्रेसला काहीही करून देशात अशांतता पसरवायची आहे, असा आरोप जावडेकर यांनी केला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times