ज्या कामांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत, त्याकरता स्वतंत्रपणे सुधारित एसओपी देण्यात येईल. सरकारने एसओपी देण्याची तारीख अद्याप दिलेली नाही, असं गृह मंत्रालयाने म्हटलं आहे.
महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना
– सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सरकार मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगसह सर्व आवश्यक नियमांचे पालन करण्याचा निर्णय घेतील.
– जिल्हा अधिकारी आवश्यकतेनुसार कंटेन्ट झोन ठरवू शकतील. पण त्यासाठी आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशांकडे काळजी घ्यावी लागेल.
– कंटेन्मेंट झोनमधील सर्व उपायांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा, पोलिस आणि पालिका अधिकारी जबाबदार असतील.
– राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सरकार यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांच्या उत्तरदायित्वाचा निर्णय घेतील.
– आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासाबद्दल गृह मंत्रालयाच्या सल्ल्यानंतर नागरी उड्डाण मंत्रालय निर्णय घेईल.
– ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिक, गर्भवती महिला आणि १० वर्षांखालील मुलांना विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
– पॅसेंजर ट्रेन, शाळा, हॉटेल आणि रेस्टॉरंट्ससारख्या अनेक गर्दीच्या ठिकाणांसाठी आधीच एसओपी जारी करण्यात आल्या आहेत. त्यांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल.
– कंटेन्मेंट झोनच्या बाहेर, राज्य, केंद्रशासित प्रदेशाच्या एसओपीनुसार सामाजिक, धार्मिक, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी दिली जाईल.
– आता सर्व प्रकारचे प्रदर्शन हॉल उघडण्यात येतील. यासाठी वाणिज्य विभाग एसओपी जारी करेल.
– आतापर्यंत ट्रेनमधील प्रवास, हवाई प्रवास, मेट्रो ट्रेन, शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे, हॉटेल, शॉपिंग मॉल्स, मल्टिप्लेक्स, उद्याने, योग वर्ग आणि जिमसाठी वेळोवेळी एसओपी देण्यात आल्या आहेत. त्यांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times