मुंबई: स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरावर इंडिगो या विमान कंपनीने सहा महिन्यांसाठी विमान प्रवास करण्यास बंदी घातली आहे. कुणाल कामराने पत्रकार अर्णब गोस्वामीला विमानातच खडे बोल सुनावले. त्यावरून इंडिगोने ही कारवाई केली आहे. एअर इंडियानेदेखील कुणाल कामरावर सहा महिन्यांसाठी बंदी घातली आहे.

कुणाल कामरा आणि अर्णब गोस्वामी हे दोघेही मुंबई-लखनऊ विमान प्रवासात एकत्र होते. त्यावेळी कुणाल कामराने अर्णबच्या आसनाजवळ जात त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. कुणाल कामरा याने अनेकदा अर्णब गोस्वामीच्या पत्रकारितेच्या हेतूवरच प्रश्न उपस्थित केले होते. आज सोशल मीडियावर कुणाल कामराचा अर्णबला जाब विचारतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आज रात्री इंडिगोच्यावतीने कारवाई करण्यात आली. विमानात सहप्रवाशांसोबत गैरवर्तवणूक केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आल्याचे इंडिगोने म्हटले आहे.

नागरी उड्डान मंत्री हरदीप सिंग सुरी यांनीदेखील कुणाल कामरावर अन्य विमान कंपन्यांनीदेखील कारवाई करण्याची सूचना केली. अशा प्रवाशांनी विमान प्रवास करणे हे इतर प्रवाशांसाठी धोकादायक असल्याचेही सुरी यांनी म्हटले.

कुणाल कामरावर इंडिगो, एअर इंडियाने केलेल्या कारवाईचे पडसाद सोशल मीडियावर उमटले आहे. कुणाल कामराने देखील विमान प्रवासात काय घडले याची माहिती दिली असून झालेल्या कारवाईला आपल्या खास अंदाजात उत्तर दिले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here