आज गुरुवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९२.८६ रुपये आहे. एक लीटर डिझेल ८३.३० रुपयांना मिळत आहे.दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८६.३० रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ७६.४८ रुपये आहे. चेन्नईत देखील आज पेट्रोलचा भाव ८८.८२ रुपये असून डिझेल ८१.७१ रुपये आहे. कोलकात्यात एक लिटर पेट्रोलचा भाव ८७.६९ रुपये असून डिझेल ८०.०८ रुपये आहे. बंगळुरात आज एक लीटर पेट्रोलचा भाव ८९.२१ रुपये असून डिझेलचा भाव ८१.१० रुपये आहे.
करोना विषाणूच्या रुग्णसंख्येत चिंताजनक वाढीमुळे डब्ल्यूटीआय क्रूडच्या दरात बुधवारी किरकोळ घसरण झाली होती. करोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे प्रमुख अर्थव्यवस्थांवर निर्बंध लागल्याने कच्च्या तेलाच्या अर्थकारणावर परिणाम झाला. अमेरिकी डॉलर घसरल्यानंरतही कच्च्या तेलाची मागणी घटली. अतिरिक्त प्रोत्साहनपर मदतीमुळे तेलाच्या दरांवर आणखी दबाव आला.
जगातील प्रमुख उत्पादक सौदी अरेबियाने साथीमुळे लागलेल्या निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर, दररोज एक दशलक्ष बॅरल तेलाचे उत्पादन कपात करण्याची घोषणा केली. त्यामुळे तेलाच्या किंमतींना आधार मिळेल. विषाणूच्या उद्रेकामुळे मागणीची चिंता वाढली, त्यामुळेही कच्च्या तेलाचे दर घसरले. याउलट अमेरिकी क्रूडसाठ्यात घसरण झाल्यामुळे दरांच्या घसरणीवर मर्यादा येऊ शकते. आज जागतिक बाजारात क्रूड आॅइलचा भाव ५२.५१ डाॅलर प्रती बॅरल आहे. तर ब्रेंट क्रूडचा भाव प्रती बॅरल ५५.५७ डाॅलर आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times