मुंबई:
नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसी मुद्द्यावर बॉलिवूड अभिनेत्री आणि निर्माती-दिग्दर्शक हिने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पूजा भट्ट म्हणाली, ‘मी नेत्यांना विनंती करते की देशभरात उठणारा आवाज ऐका.’ पूजा हिने मुंबईत, शाहीन बाग आणि लखनऊमध्ये होणाऱ्या आंदोलनांचा उल्लेखही केला. ती म्हणाली, ‘मी सीएए आणि एनआरसीचं समर्थन करत नाही, कारण ते घरं फोडणारे आहेत.’

पूजा भट्ट म्हणाली, ‘मी आपल्या नेत्यांना विनंती करते की देशभरात उठणारे आवाज ऐका. भारताच्या महिलांचा आवाज ऐका. शाहीन बाग आणि लखनऊच्या महिलांचा आवाज ऐका. आमचा आवाज ऐकला जाणार नाही तोपर्यंत आम्ही थांबणार आहे. मी लोकांना विनंती करते की यावर जास्तीत जास्त बोला. मी माझ्या घराचं विभाजन करणाऱ्या सीएए-एनआरसीचं समर्थन करत नाही.’

दक्षिण मुंबईत कुलाबा येथे सीएए-एनआरसीविरोधी आंदोलनाच्या संकल्पनेवर आधारित एका कार्यक्रमात पूजा बोलत होती. परचम फाउंडेशन आणि वी द पीपल ऑफ महाराष्ट्र यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सीएए-एनआरसी विरोधात सुरू असलेल्या आंदोलनांमधून आपल्याला हा संदेश मिळतो की आता आवाज उठवण्याची वेळ आली आहे. पूजा म्हणाली, ‘आपलं मौन आपल्याला वाचवणार नाही आणि सरकारलाही. सत्ताधारी पक्षाने खरं तर आपल्याला एकत्र आणलंय. मतभेद ही देशभक्तीचं सर्वात मोठं रुप आहे.’

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here