वाचा:
मुंबईवर कर्नाटकचाही हक्क आहे. हे शहर कर्नाटकात असले पाहिजे, अशी कानडी जनतेची भावना आहे. त्यामुळं कर्नाटकात येत नाही तोवर हे शहर केंद्रशासित म्हणून घोषित करावे, असं वक्तव्य सावदी यांनी केलं होतं. सावदी हे कर्नाटक भाजपचे मोठे नेते आहेत. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळं महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. महाविकास आघाडीतील नेत्यांनी भाजपवर टीकेची तोफ डागली आहे. काँग्रेसनं हा सगळा भाजपचा डाव असल्याचं म्हटलं आहे.
वाचा:
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते यांनी केंद्र सरकारच्या भूमिकांचे दाखले देत भाजपवर आसूड ओढला आहे. ‘सावदी यांच्या या मागणीतून मोदी सरकारचा कुटिल डाव दिसून येतो. मुंबईला व महाराष्ट्राला कमकुवत करण्याचा भाजपचा अंतस्थ हेतू राहिला आहे. गेल्या सहा वर्षांत मुंबईची, महाराष्ट्राची आणि मुंबई पोलिसांची ज्या पद्धतीनं बदनामी केली गेली ते सर्वांच्या समोर आहे. मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र व इतर उद्योग गुजरातला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, फडणवीस सरकार गप्प बसून होतं. त्यांच्या या भूमिकेमुळं भाजपचं कारस्थान उघडं पडलं आहे. मुंबईला केंद्रशासित करावं हाच यामागचा हेतू होता. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत येऊन बॉलिवूड दुसरीकडं घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. सीबीआय, ईडी आणि एनसीबी मागे लावून उद्योगांना नामोहरम केलं जातं. बॉलिवूड कलाकारांना त्रस्त केलं जातं हा याच डावाचा भाग आहे,’ असा आरोप सावंत यांनी केला आहे.
वाचा:
‘भाजपनं मुंबईकडे वाईट नजरेनं पाहिलं तर मुंबई, महाराष्ट्र त्यांना कधीच माफ करणार नाही. महाराष्ट्रात राजकारण करणं त्यांना कठीण होऊन जाईल,’ असा इशाराही सावंत यांनी दिला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times