जळगाव: भाजपच्या संकेतस्थळावर घडलेला प्रकार कालच मला समजला. याबाबत स्वतः पोलीस अधीक्षक आणि पक्षाच्या वरिष्ठांशी याबाबत चर्चा केली. या प्रकाराची चौकशी सुरू आहे. हा प्रकार भाजपकडून घडलेला नाही. चौकशीत सत्य समोर येईल, अशी प्रतिक्रिया खासदार रक्षा खडसेंनी आज जळगावात दिली. दरम्यान अशा प्रकाराची माहिती शेअर करणे योग्य नसल्याचेही म्हणाल्या.

वाचा:

जिल्हाधिकारी कार्यालयात रक्षा खडसे आज एका बैठकीसाठी आलेल्या होत्या. यावेळी त्यांनी भाजपच्या संकेतस्थळावर झालेल्या चुकीच्या प्रकाराबाबत आपली भूमिका व्यक्त केली. यावेळी त्यांनी सांगितले की, भाजपच्या संकेतस्थळावर लोकसभा सदस्यांच्या यादीत माझ्या नावाखाली आक्षेपार्ह शब्दप्रयोग असल्याबाबत मला काल सायंकाळी माहिती मिळाली. त्यानंतर या विषयाबाबत मी तत्काळ पोलीस अधीक्षक आणि पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा केली. हा प्रकार भाजपकडून झालेला नाही. माझ्याकडे व्हाट्सअॅपवर याबाबत जे काही स्क्रीनशॉट आलेत, त्यात हा प्रकार ‘सेव्ह महाराष्ट्र फ्रॉम बीजेपी’ म्हणून असलेल्या पेजवरून व्हायरल झाल्याचे दिसते आहे. हे पेज कोण चालवतो, त्याची मला माहिती नाही. पण या प्रकाराची पोलीस आणि आमच्या पक्षाकडून चौकशी सुरू आहे, असे खासदार रक्षा खडसे यांनी सांगितले.

भाजपाच्या अधिकृत संकेतस्थळावरील चूक नाही

खासदार खडसे पुढे म्हणाल्या, हा प्रकार मला कळाल्यानंतर मी रात्री १० वाजता भाजपच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहणी केली, तेव्हा मला कोणत्याही प्रकारची चूक आढळली नाही. त्यामुळे कुणीतरी भाजपच्या संकेतस्थळाचे स्क्रीनशॉट घेऊन नंतर त्यावर एडिटिंग करून हा प्रकार केल्याचा संशय आहे. आता या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, त्यात सारा प्रकार समोर येईलच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मात्र, एखाद्या महिलेच्या बाबतीत असा प्रकार घडल्यानंतर अशा गोष्टीला सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील, त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल करणे चुकीचे आहे. या साऱ्या प्रकारामुळे मला दुःख झाले, असेही त्या म्हणाल्या.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here