वाचा:
बच्चू पांडे हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. ८० आणि ९० च्या दशकात मराठी आणि हिंदी वाद्यवृंदांची लोकप्रियता शिखरावर होती. या काळात ‘मेंदीच्या पानावर’ या वाद्यवृंदाला आणि बच्चू पांडे यांच्या निवेदनाला चाहत्यांनी डोक्यावर घेतले होते. हिंदी गाण्यांमुळे काही काळ मागे पडलेल्या जुन्या अवीट गोडीच्या मराठी गीतांना ‘मेंदीच्या पानावर’ या वाद्यवृंदाने उर्जितावस्था आणली.
वाचा:
या वाद्यवृंदातील गाणी आणि संगीत या सोबतच बच्चू पांडे यांचे निवेदन हे मराठी रसिकांसाठी आकर्षण होते. गाण्याच्या आधी त्या गीताची पार्श्वभूमी, म्हणी, वाक्प्रचार याचा बेमालूम वापर करत ते आपले निवेदन खुलवायचे. त्यामुळे रसिकांना ते कायम भावत असे. कॅसेटच्या जमान्यात आलेल्या ‘मेंदीच्या पानावर’ कॅसेटचे दहा भाग प्रसिद्ध झाले आहेत. पांडे यांनी या वाद्यवृंदानंतर सुरेखा पुणेकर व इतर काही लावणी कलावंतांच्या लावणीच्या कार्यक्रमाचे निवेदन देखील केले होते.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times