मुंबई: महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये सार्वजनिक कार्यक्रमांची सुरुवात राष्ट्रगीताने व्हावी, असा आमचा मानस असून याबाबतचे आदेश लवकरच राज्य सरकारकडून काढण्यात येतील, असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले आहे.

एल्फिन्स्टन महाविद्यालयात आयोजित एका कार्यक्रमात बोलत असताना शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रगीताच्या आग्रहामागचे कारणही स्पष्ट केले. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रवाद आणि देशभक्तीची भावना वाढीस लागावी म्हणून महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने व्हावी, असा आमचा आग्रह असल्याचे सामंत यांनी नमूद केले. महाराष्ट्रात सर्व चित्रपटगृहांमध्ये चित्रपट सुरु होण्याआधी राष्ट्रगीत लावण्यात येते. त्याचा दाखला देत सामंत यांनी महाविद्यालयातील राष्ट्रगीताच्या आवश्यकतेवर जोर दिला.

महाविद्यालयांची नावे मराठीतच हवीत

उदय सामंत यांनी यावेळी मराठीच्या मुद्यावरही बोट ठेवले. महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयांची नावे मराठीत लिहिली गेली पाहिजेत. याबाबतही येत्या काळात सर्व महाविद्यालयांना निर्देश देण्यात येतील, असे सामंत यांनी सांगितले.

आणखी वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here