म. टा. प्रतिनिधी, जळगाव: कुठल्याही महिलेच्या विरुद्ध कुणी आक्षेपार्ह टाकत असेल तर त्याला शिक्षा दिली गेली पाहिजे. आमचे राज्य व देश महिलेचा सन्मान ठेवणारा आहे. त्यामुळे महिलेसंदर्भात असा चावटपणा करणाऱ्याला तुरुंगातच टाकायला हवे, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे.

भाजपच्या अधिकृत संकेतस्थळावर रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजप खासदार रक्षा खडसेंच्या बाबतीत आक्षेपार्ह उल्लेख केल्याची बाब समोर आली आहे, या विषयासंदर्भात बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज सकाळी जळगावात आपली प्रतिक्रिया दिली.

गुलाबराव पाटील यांनी सांगीतले की, या प्रकारासंदर्भात आपल्याला नुकतीच माहिती मिळाली. हा प्रकार अतिशय संतापजनक आहे. कोणत्याही महिलेच्या विरुद्ध कुणी असे आक्षेपार्ह टाकत असेल तर त्याची चौकशीच नव्हे तर त्याला शिक्षा दिली गेली पाहिजे. कारण महिलेचा सन्मान ठेवणारे आमचे राज्य आणि देशही आहे. त्यामुळे असा चावटपणा करणाऱ्याला आतमध्ये टाकायला हवे, असे गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here