चार सप्टेंबर १९३७ रोजी महाबळेश्वरमध्ये जन्मलेले सारडा हे पत्रकार, समीक्षक आणि बालसाहित्यकार म्हणून प्रसिद्ध होते. किशोरवयापासूनच त्यांचं लेखन आनंद, बालमित्र, साधना, मुलांचे मासिक यांसारख्या अंकांमधून प्रसिद्ध व्हायला सुरुवात झाली होती.
महाराष्ट्र टाइम्सची रविवार पुरवणी, महाराष्ट्र साहित्य पत्रिका, साधना, दैनिक देशदूत, लोकमित्र पुरवणी, लोकमत रविवार पुरवणी, ग्रंथजगत अशा विविध वृत्तपत्रांमधील कामाचा त्यांचा दीर्घ अनुभव आहे. विशेषतः महाराष्ट्र टाइम्सच्या पुरवणीतून सारडा यांनी ‘चक्र,’ ‘माहीमची खाडी,’ ‘वासुनाका’ अशा पुस्तकांवर लिहिलेला विस्तृत लेख आणि इतरही महत्त्वाच्या कविता-कादंबऱ्यांची केलेली परीक्षणं गाजली होती. ‘मटा’ सुरू झाल्यानंतर त्याचं रूप घडवण्यात संपादक द्वा. भ. कर्णिकांना सारडा यांची चांगलीच साथ लाभली होती. त्यांनी सुरुवातीच्या काळात सदानंद रेगे, वसंत बापट, वा. ल. कुलकर्णी यांच्यासारख्यांना ‘मटा’शी जोडण्याचं महत्त्वाचं काम केलं होतं.
त्यांनी ६०हून अधिक पुस्तकं लिहिली असून, दोन हजांराहून जास्त पुस्तकांचं समीक्षण केलं आहे. टॉल्स्टॉय, गिबन यांसारख्या प्रख्यात लेखकांच्या कादंबऱ्यांचा त्यांनी अनुवाद केला आहे. त्यांनी १९५०पासून सातत्यानं बालसाहित्य लिहिलं आहे.
क्लिक करा आणि वाचा-
झिपऱ्या आणि रत्नी, नंदनवनाची फेरी, दूरदेशचे प्रतिभावंत, जेव्हा चुंबनाला बंदी होते, मांत्रिकाची जिरली मस्ती, स्त्रीवादी कादंबरी, विश्वसाहित्यातील फेरफटका, बेस्टसेलर बुक्स, ग्रंथ संवत्सर, ग्रंथ वैभव, ग्रंथ विशेष अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times