राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर पुढील सुनावणी २८ जानेवारीला होत असून तो पर्यंत खडसे यांना अटक करणार नाही, अशी माहिती सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) वकिलांनी मुंबई हायकोर्टात दिली होती. यामुळे एकनाथ खडसे यांना २८ जानेवारीपर्यंत दिलासा मिळाला होता. मात्र, आजही या प्रकरणावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याने खडसेंना ३ फेब्रुवारीपर्यंच दिलासा मिळाला आहे.
ईडीने आपल्याविरोधात दाखल केलेला गुन्हा रद्द करावा, अशी मागणी करणारी खडसे यांच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी होत आहे.
पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणात ईडीने एकनाथ खडसे यांना समन धाडले होते. समन धाडतानाच ईडीने खडसेंना काही प्रश्न देखील विचारले होते. आपल्याला समन मिळाले नाहीत, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले होते. समन मिळाल्यानंतरच आपण सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ, असे खडसेंनी सांगितले होते.
क्लिक करा आणि वाचा-
ऑक्टोबर २०२० मध्ये एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. जर आपल्यामागे कोणी ईडी लावली तर मी सीडी लावेन असे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना एकनाथ खडसे यांनी म्हटले होते. त्यानंतर मात्र अजूनही खडसे यांनी सीडीचा उल्लेख केलेला नाही.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times