नवी मुंबईः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांना ६ फेब्रुवारी रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. न्यायाधीश बडे यांच्या दालनात झालेल्या सुनावणीनंतर या आदेश देण्यात आले आहेत.

कार्यकर्त्यांनी २६ जानेवारी २०१४मध्ये वाशी टोल नाक्याची तोडफोड केली होती. त्यावेळी राज ठाकरेंसह अन्य सहा कार्यकर्त्यांवर ३० जानेवारी २०१४ रोजी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी राज ठाकरेंना २०१८ व २०२०मध्ये समन्स आणि वॉरंट जारी करण्यात आलं होतं. आज न्यायालयानं ते वॉरंट रद्द करण्यात आलं आहे. मात्र, ६ फेब्रुवारीला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

२०१४मध्ये राज ठाकरेंनी सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत टोलनाक्यांच्या विरोधात आंदोलन पुकारलं होतं. २६ जानेवारी २०१४ रोजी राज ठाकरेंनी वाशी इथल्या मेळाव्यात टोल नाका बंद करण्याबाबत प्रेक्षोभक भाषण केलं होतं. राज ठाकरेंच्या याच भाषणाबाबत गजानन काळे आणि अन्य काही कार्यकर्त्यांनी वाशी टोल नाक्याची तोडफोड केली होती. त्यानंतर राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वाचाः

दरम्यान, राज ठाकरेंवरील वॉरंट वाशी न्यायालयानं रद्द केले आहेत. मात्र, ६ फेब्रुवारी रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. जामीन न घेतल्यानं कोर्टानं तसे आदेश दिल्याचं सांगण्यात येतं आहे.

वाचाः

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here