पाच वर्षापूर्वी राज्यात १९० सूतगिरण्या होत्या. पण दरवर्षी काही गिरण्या बंद पडत असल्याने ही संख्या सध्या दीडशेपर्यंत पोहोचली आहे. सध्या तर केवळ ६४ गिरण्या सुरू असून त्यातीलही काही आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. रोज १५ लाख चात्यांच्या माध्यमातून तीन हजार कोटी रूपयांची सूत तयार होत असून तेथे राज्यात चाळीस हजार कामगार थेट काम करत आहेत.
इतर राज्याच्या तुलनेत वाढलेले वीजेचे दर, काही गिरण्यांना उभारणीसाठी लागलेला वेळ, त्यातून वाढलेला खर्च, सलग चार ते पाच वर्षे आलेली , भाग भांडवलची कमतरता यामुळे या गिरण्यांना आर्थिक घरघर लागली आहे. या उद्योगात सध्या अनेक राजकीय नेते आहेत. जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री विश्वजित कदम, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, सुनिल केदार, विजयसिंह मोहिते, जयवंतराव आवळे, रोहिदास पाटील, अमित देशमुख,गणपतराव देशमुख, आमदार पी.एन. पाटील, विनय कोरे, प्रकाश आवाडे असे अनेक दिग्गज या क्षेत्रात आहेत. तरीही राज्य सरकार मदत करत नसल्याची तक्रार आहे.
ओला दुष्काळ, अवकाळी पाऊस, कोरोना आणि इतर काही कारणाने दोन वर्षे या गिरण्यांना फार मोठा आर्थिक फटका बसला. कापूस चांगला नसल्याने निर्यातीवर परिणाम झाला. या सर्वाचा परिणाम म्हणून राज्यातील बहुतांशी सूतगिरण्यांना फार मोठा फटका बसला. सहकारी साखर कारखान्यांच्या पाठोपाठ राजकीय नेत्यांची मोठी गुंतवणूक या उद्योगात आहे. त्यामुळे खासगी आणि सहकारी या दोन्ही सूतगिरण्या सुरू राहण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. त्याला राज्य व केंद्र सरकारकडून मदतीचा हात मिळत नसल्याने त्यांच्या अडचणी वाढत आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
राज्यात एकूण ११४ सूतगिरण्या असून त्यांपैकी ४६ सूतगिरण्या खासगी आहेत. यांपैकी एकूण ६४ सूतगिरण्या सुरू आहेत. तसेच राज्यातील यंत्रमागांची संख्या १४ लाख इतकी आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times