मुंबई: आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या ()ने आता २०२१च्या म्हणजेच १४व्या हंगामाची तयारी सुरू केली आहे. आयपीएलच्या १३ पैकी सर्वाधिक ५ हंगामाचे मुंबईने विजेतेपद मिळवले आहे. मुंबई संघाच्या या यशा मागे संघातील खेळाडू ही घरी ताकद आहे. नव्या युवा खेळाडूंना मुंबई संघ नेहमीच प्रोत्साहन देत असते.

वाचा-

आयपीएलच्या १४व्या हंगामात मुंबई इंडियन्सने अशाच एका नव्या खेळाडूला संधी देण्याचे ठरवले आहे. नागालँडच्या याला मुंबई संघाने ट्रायलसाठी निवडले आहे. या शिवाय अन्य खेळाडूंचे मुंबई संघ ट्रायल घेणार आहे.

वाचा-

केंस हा राज्यातील पहिला खेळाडू आहे ज्याने आयपीएलच्या एखाद्या संघाला आकर्षित केले आहे. १६ वर्षीय फिरकीपटू असलेल्या केंसने सैय्यन मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. केंसने मुश्ताक अली स्पर्धेतून पदार्पण केले. त्याने चार सामन्यात सात विकेट घेतल्या. पण त्याच्या कामगिरीचा संघाला फायदा झाला नाही. नागालँडने चारही लढती गमावल्या.

वाचा-

केंसने १२च्या सरासरीने गोलंदाजी केली. मिझोराम विरुद्ध त्याने १६ धावा ३ विकेट घेतल्या होत्या. यात त्याची सरासरी ५.४७ होती. मुंबई इंडियन्सच्या एका अधिकाऱ्यांनी या युवा खेळाडूशी संपर्क केला.

वाचा-

नागालँडच्या एका छोट्या गावातून येणाऱ्या केंससाठी ही मोठी गोष्ट आहे. मुश्ताक अली स्पर्धेत खेळल्यामुळे तो आयपीएलच्या लिलावासाठी देखील उपलब्ध झाला आहे. मुंबई इंडियन्स या युवा खेळाडूवर बोली लावू शकते.

वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here