अण्णांच्या आंदोलनाची सुरुवात येत्या ३० जानेवारी रोजी महात्मा गांधींच्या पुण्यतिथीपासून राळेगणसिद्धी येथून होणार आहे. पाठिंबा देणाऱ्यांनी आपापल्या ठिकाणांहून यात सहभाग व्हावं, असं आवाहनही हजारे यांनी केलं आहे.
आम्ही सरकारकडे आमच्या मागण्या वारंवार मांडल्या आहेत. या मागण्यांसाठी गेल्या तीन महिन्यांत मी पंतप्रधान आणि कृषी मंत्र्यांना पाच वेळा पत्रही लिहिले आहे. त्यानंतर सरकारचे प्रतिनिधी इथे येऊन चर्चाही करत आहेत. मात्र, अद्याप या मागण्यांवर कोणताही योग्य तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आता मी ३० जानेवारी २०२१ रोजी महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथी दिनी राळेगणसिद्धी येथील यादवबाबा मंदिरात उपोषणाला बसणार आहे, असे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.
मी फक्त राळेगणसिद्धी येथून करणार आहे. मला समर्थन देऊ इच्छिणाऱ्यांनी आपापल्या गावातून, जिल्हाधिकारी कार्यालयावर शांततेत आंदोलन करावे. अद्यापही करोनाचा धोका टळलेला नाही त्यामुळे राळेगणसिद्धी येथे गर्दी करणे योग्य ठरणार नाही, असे आवाहनही अण्णांनी लोकांना केले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
दिल्लीतील शेतकरी आंदोलनात घडलेल्या घटनेने आपण दु:खी असल्याचेही अण्णा म्हणाले. मी कायमच अहिंसात्मक आंदोलन करत आलो आहे. गेल्या ४० वर्षांत मी अनेकवेळा आंदोलने केलेली आहेत. २०११ मध्ये दिल्लीत झालेल्या लोकपालासाठीच्या आंदोलनात लाखोंच्या संख्येने जनतेने सहभाग नोंदवला होता. मात्र, त्या आंदोलनात एकानेही एक दगडही उचलला नाही. शांतता हीच आंदोलनाची शक्ती आहे, असे गांधीजींनी आम्हाला शिकवले आहे. आंदोलानात कोणत्याही प्रकारे हिंसा होता कामा नये, असेही अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times