मुंबई: वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेल्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या ऐतिहासिक मुंबई महानगर पालिकेत (BMC) आजपासून सर्वसामान्यांना (Heritage Walk) करता येणार आहे. हा हेरिटेज वॉक आजपासून सुरू झाला आणि याचा पहिला मान मिळाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray, उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांना. (cm and dcm had a in BMC building)

ऐतिहासिक वास्तू असलेल्या मुंबई महापालिकेला पर्यटकांना भेट देता यावी म्हणून मुंबई महापालिकेने आजपासून हे हेरिटेज वॉक सुरू केले आहे. यामुळे आता कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीला या वास्तू पाहता येणार आहे, मुख्यमंत्री यांच्या हस्ते आज या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

आदित्य ठाकरेंनी दिली अजित पवारांना माहिती
मुख्यमंत्री ठाकरे येण्यापूर्वीच अजित पवार, बाळासाहेब थोरात आणि आदित्य ठाकरे पालिकेत आले होते. या वेळी पालिका सभागृहाच्या बाहेरील पाऱ्यांवर थांबून अजित पवारांनी पालिकेची पाहणी केली. उपमुख्यमंत्र्यांनी पालिकेचे दरवाजे, दगडी भिंती, मोठमोठी जुनी झुंबरे आणि पालिकेचा घुमट अजित पवार कुतुहलाने न्याहाळात होते. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी त्यांच्याजवळ जाऊन त्यांना माहिती देण्यास सुरुवात केली.

नेत्यांनी केला हेरिटेज वॉक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पालिकेत दाखल झाल्यानंतर मग नेत्यांचे हेरिटेज वॉक सुरू झाले. त्यानंतर उपस्थित सर्वच नेते पालिकेच्या गॅलरीत गेले. या नेत्यांनी पालिकेत हेरिटेज वॉक केला. पालिकेच्या मुख्य गॅलरीत येऊन हे नेते थांबले. या निमित्ताने या सर्व नेत्यांनी पालिकेच्या रमणीय गॅलरीत उभे राहून गप्पा मारल्या.

या सोहळ्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि पर्यटन राज्य मंत्री आदिती ठाकरे हे मुख्यमंत्री येण्यापूर्वी संध्याकाळी साडेपाच वाजताच महापालिकेत हजर झाले. त्यानंतर १५ मिनिटांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पालिकेत आले. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, महापौर किशोरी पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे नगरसेवक यावेळी पालिकेत उपस्थित होते. महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल हे देखील उपस्थित होते.

क्लिक करा आणि वाचा-

पर्यटक दर शनिवार, रविवारी घेऊ शकतात हेरिटेज वॉक
पर्यटक किंवा सर्वसामान्य नागरिकांना दर शनिवार, रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी पालिकेत येऊन हेरिटेज वॉक करता येणार आहे. त्यासाठी एक गाईडची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. या द्वारे सर्वसामान्यांना या ऐतिहासिक वास्तूचा इतिहास आणि वैशिष्ट्ये जाणून घेता येणार आहेत.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here