देवेंद्र फडणवीस पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात चौफेर टोलेबाजी करत सत्ताधाऱ्यांवर तुटून पडले. त्यांनी कोरोना संकटाची हाताळणी, मेट्रो कारशेड आणि अन्य मुद्द्यांवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. काही लोकांच्या इगोमुळे पुढची चार वर्षे मेट्रो सेवा सुरु होणार नाही, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.
महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार माजलेला असताना आणि लोक मृत्यमुखी पडत असताना काही लोक वेगवेगळे पॅटर्न सांगून आपली पाठ थोपटून घेत होते. समाजात मात्र जात नव्हते, समाजाचं दु:ख समजून घेत नव्हते. त्यावेळी अनेकांना रुग्णवाहिका मिळणे मुश्कील झाले होते. लोक रस्त्यावर मरुन पडत होते. अशा काळात विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आणि इतर भाजपच्या नेत्यांनी रस्त्यावर उतरुन काम केले, असेही देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
फडणवीस पुढे म्हणाले की, अनेक लोक भाषणे करत असतात, अनेकांना ती कला चांगली अवगतही आहे. पण मैदानात संघर्षाची वेळ आली की काहीजण नंतर घरात लपून बसतात, मैदानातून पळ काढतात. असे पळ काढणारे अनेक नेते आपण पाहिले आहेत.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times