देशात एकूण १४६ जिल्हे असून गेल्या सात दिवसांपासून करोनाचे कोणतेही नवीन रुग्ण समोर आले नाही. दुसरीकडे १८ जिल्ह्यांमध्ये १४ दिवसांपासून, ६ जिल्ह्यांमध्ये २१ जिल्ह्यांमध्ये मागील २१ दिवस आणि २१ जिल्ह्यांमध्ये गेल्या २८ दिवसांत एकही नवीन रुग्ण आढळून आलेला नाही. करोनाची जवळपास दोन तृतीयांश नवीन रुग्ण हे केरळ आणि महाराष्ट्रापर्यंतच मर्यादित आहेत, असं डॉ. हर्ष वर्धन यांचं म्हणणं आहे.
लसीकरण मोहिमही तीव्र, भारत जगात पाचव्या स्थानावर
करोना रुग्णसंख्येत घट झाल्याने भारतात लसीकरणालाही वेग आला आहे. फक्त ११ दिवसांत २८ लाख ४७ हजार ६०८ आरोग्य कर्मचार्यांना लस देण्यात भारत यशस्वी झाला आहे. असे करणारा भारत हा जगातील पाचवा देश ठरला आहे. भारतात लसीकरण मोहीम १६ जानेवारीपासून सुरू झाली. तर इतर देश डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून लसीकरण करत आहेत. भारतातील लसीकरण मोहिमेच्या गतीचा अंदाज फक्त सहा दिवसांतच दहा लाख लोकांना लसी देण्यावरून मिळू शकतो. एवढच्या नागरिकांना लस देण्यासाठी अमेरिकेत १० दिवस, स्पेनमध्ये १२ दिवस, इस्रायलमध्ये १४ दिवस, ब्रिटनमध्ये १८ दिवस, इटलीमध्ये १९ दिवस, जर्मनीत २० दिवस आणि युएईमध्ये २७ दिवस लागले.
लसीकरणात दिल्ली पिछाडीवर
व्यापक लसीकरण मोहीम सुरू असूनही बर्याच राज्यांत वेग वाढलेला नसल्याने ही चिंतेची बाब आहे. ओडिशात ५० टक्क्यांहून अधिक आरोग्य कर्मचार्यांना लस देण्यात आली आहे. तर दिल्लीत फक्त १५.७ टक्के आरोग्य कर्मचार्यांना लस देण्यात आली आहे. झारखंड हे लसीकरणाची टक्केवारी केवळ १४.७ टक्के आहे. लसीकरण मोहिमेमध्ये मागे असलेल्या राज्यांशी संपर्क करून तेथील समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला जातोय, असं आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले.
ओडिशा, हरयाणा, राजस्थान, तेलंगण आणि आंध्र प्रदेशने लसीकरणात लसीकरणात चांगली कामगिरी केली आहे. या राज्यांत ३५ टक्क्यांहून अधिक आरोग्य कर्मचार्यांना लस देण्यात आली आहे. तामिळनाडू, दिल्ली, झारखंड, उत्तराखंड, छत्तीसगड, महाराष्ट्रात २१ टक्क्यांपेक्षा कमी लसीकरण झाल्याने त्यात सुधार करण्याची गरज आहे, असं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.
ब्रिटनमध्ये सापडलेल्या नवीन करोना आता ७० देशांमध्ये पसरला आहे. या नवीन व्हायरसचा संसर्ग झालेल्या भारतातील रुग्णांची संख्याही १६४ आहे, असं आयसीएमआर डीजी बलराम भार्गव म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times