कोलकाताः पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ( ) यांनीही कृषी कायद्यांवरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत आणि हे तिन्ही कायदे मागे घ्यावेत, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ( ) आज पुन्हा पश्चिम बंगालच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. आज रात्री उशिरा ते कोलकात्यात दाखल होतील. अमित शहा हे ३० आणि ३१ जानेवारीला बंगाल दौऱ्यावर येत आहेत. तीन जिल्ह्यांमध्ये त्यांचे अनेक कार्यक्रम आहेत. अमित शहांच्या दौऱ्यामुळे तृणमूल काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाला झाली आहे. कारण अमित शहांच्या १९ डिसेंबरच्या दौऱ्यात तृणमूल काँग्रेसमधील दिग्गज नेते सुवेंदू अधिकारीसह तृणमूलचे ७ आमदार आणि एका खासदाराने भाजपमध्ये प्रवेश केला होता.

अमित शहांच्या बंगाल दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ममतांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. केंद्राच्या कृषी कायद्यांचा निषेध करण्यासाठी आणि ते निष्फळ ठरण्यासाठी ममता सरकारने पश्चिम बंगाल विधानसभेचं दोन दिवसीय विशेष सत्र बोलावलं आहे. कृषी कायद्यांविरोधात विधानसभेत प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. ममता यांनी कृषी कायदे आणि दिल्लीतील हिंसाचाराबद्दलच्या आंदोलनावर सरकारवर जोरदार निशाणा साधला.

दिल्लीतील परिस्थिती पोलिस हाताळू शकले नाहीत. हे बंगालमध्ये झालं असतं तर अमित भैय्या म्हणाले असते – काय झालं. याचा आम्ही तीव्र निषेध करतो. आम्हाला हे तिन्ही कृषी कायदे निष्फळ करायचे आहेत, अशी आमची इच्छा आहे. तुम्ही एकतर कायदे मागे घ्या किंवा खुर्ची तरी सोडा, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत आणि हे कायदे मागे घ्यावेत अशी आमची इच्छा आहे. हे कायदे बळजबरीने मंजूर केले गेले आहेत. मोदी सरकारने दिल्लीतील हिंसाचार अत्यंत वाईट पद्धतीने हाताळला आहे. तिथे घडलेल्या घटनांसाठी पूर्णपणे भाजप जबाबदार आहे. आधी त्यांनी दिल्ली सांभाळावी, त्यानंतर बंगालचा विचार करावा, असा टोला ममता बॅनर्जींनी लगावला.

काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनीही दिल्लीतील हिंसाचारासाठी भाजप आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे जबाबदार असल्याचा आरोप केला होता. लाल किल्ल्यात घुसलेले आंदोलक हे भाजपचे एजंट होते. याला अमित शहा जबाबदार आहेत. त्यामुळे कॉंग्रेसने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या हिंसाचाराला कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी जबाबदार असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला होता. चिदंबरम यांनी जावडेकरांवरही टीका केली. ‘मिस-इन्फोर्मेशन अॅण्ड ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर’ यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असं चिदम्बरम म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here