वाचा:
प्रवीण दरेकर यांच्या कारकीर्दीचा आढावा घेणाऱ्या ‘वर्षभराचा लेखाजोखा’ या पुस्तकाचे प्रकाशन आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना दरेकर यांनी विरोधकांवर अप्रत्यक्षपणे तोफ डागली. यांच्या टीकेवर आज पुन्हा एकदा दरेकरांनी भाष्य केले. महाराष्ट्राचे जाणते नेते शरद पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाचं अवमूल्यन झाल्याची व आपल्याला लाज वाटत असल्याची टीका माझ्यावर केली. त्याचे शल्य मनात नक्कीच आहे. पवारांच्या वक्तव्याचे मला वाईट वाटले. म्हणूनच मी पवार यांना पत्र पाठवले आणि आज पुस्तक प्रकाशनानंतर वर्षभराचा लेखाजोखा या पुस्तकाची प्रतही त्यांना पाठवत आहे. त्यांनी हे पुस्तक वाचावे म्हणजे त्यांना विरोधी पक्षनेतेपदाची लाज वाटणार नाही. ते माझ्या विरोधी पक्षनेतेपदाच्या काळातील कार्याचा आढावा बघून नक्कीच खुल्या दिलाने माझे कौतुक करतील, असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला. यावेळी प्रवीण दरेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. भाजपाकडे मी कधीच काहीही मागितलं नाही. देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर विश्वास टाकून न सांगता, न मागता मला आमदार केलं आणि विरोधी पक्षनेतेपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली, असे दरेकर म्हणाले.
वाचा:
माजी मंत्री भाषणात म्हणाले की, लेखाजोखा या पुस्तकाचं आज प्रकाशन झालं. या सोहळ्यात आल्यानंतर आता मला पण असं वाटत आहे, की मी माझ्या कारकिर्दीचा आढावा घेणारे पुस्तक मी काढायला पाहिजे. मी गेले अनेक वर्षे काम करत आहे. माणूस समाजामुळे ओळखला जात नाही तर त्यांच्या कर्तृत्वामुळे ओळखला जातो. प्रवीण दरेकर हे त्यांच्या कर्तुत्वामुळे ओळखले जात आहेत. महाराष्ट्रात आलेल्या संकाटाच्या काळात क्वारंटाइन सेंटर्स, कोविड सेंटर्स येथे जीवाची पर्वा न करता ते पोहचले. कोकणात आलेल्या वादळात शेतकऱ्यांच्या मदतीला सर्व प्रथम धावून गेले. दरेकर यांनी खूप कमी वेळात मोठी कामगिरी केली. आज ते भाजपचे झुंझार नेते म्हणून ओळखले जातात, असे गिरीश महाजन यांनी सांगितले. या कार्यक्रमाला भाजप मुंबईचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, दादा महाराज मोरे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, भाई गिरकर, आमदार सदाभाऊ खोत, आमदार प्रसाद लाड, आमदार राहुल नार्वेकर उपस्थित होते.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times