मुंबई- बॉलिवूडचा खिलाडी कुमार सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. सामाजिक विषयांवर सिनेमा करण्यापासून ते अनेक कामांना आर्थिक मदत करण्यात तो नेहमीच सक्रिय असतो. सामाजिक कार्यक्रमांमध्येही तो आवर्जुन भाग घेतो. अक्षयकडे असलेल्या समाज जाणिवेचं कौतुक सारेच करतात. पण यावेळी मात्र असं झालं नाही. त्याचं कौतुक करण्यापेक्षा युझर्सने त्याला ट्रोल केलं. एका कार्यक्रमात जाणं अक्षयला भारी पडलं असंच म्हणावं लागेल.

त्याचं झालं असं की अक्षयने देशात होत असलेल्या पाण्याच्या समस्ये संदर्भातील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. येथे त्याने पाणी भरण्यासाठी दररोज २१ किमी चालत जाणाऱ्या महिलांच्या वेदनेचा विषय मांडला. एवढंच नाही तर अक्षयने त्या महिलांबद्दल सहानुभूती दर्शविण्यासाठी तो ट्रेडमिलवर २१ किमी चालला. पण यावेळी चाहत्यांना त्याचा हा अंदाज फारसा आवडला नाही आणि त्यांनी अक्षयला ट्रोल करायला सुरुवात केली.

अक्षयचा ट्रेडमिलवर चालण्यामागचा हेतू हा महिलांना पाणी आणण्यासाठी होणाऱ्या कष्टाची जाणीव करून देणं हाच होता. त्यामुळे त्यांच्या समस्या वाढवण्याऐवजी पाण्याचा सांभाळून वापर केला पाहिजे, जेणेकरुन त्यांना अशा प्रकारच्या अडचणींचा सामना करणे टाळता येईल.

दिग्दर्शक नीरज घेवान यांनी अक्षयच्या ट्रेडमिलवर धावण्याच्या ट्वीटवर आपली प्रतिक्रिया दिली. नीरज यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये कुठेही अक्षयचं नाव घेतलं नाही. पण तरीही त्यांचा रोष अक्षयवर होता. ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले की, ‘एखाद्या शेतात जाऊन काम करा, मग घरी येऊन स्वयंपाक करून घरातली सर्व कामं करा आणि पुन्हा या सर्व गोष्टी करत राहा. ट्रेडमिल हे एखाद्या रोलर कोस्टर राइडसारखं आहे. त्याची तुलना करता येऊ शकत नाही.’ अक्षयच्या या पोस्टवर काही युझर्सने शेतकरी आंदोलनासंदर्भात त्याच काय मत आहे हे जाणून घेण्याची इच्छा वर्तवली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here