वाचा:
संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी ही माहिती दिली. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर मागील वर्षी मार्च महिन्यात राज्यातील धार्मिक स्थळे बंद करण्यात आली होती. राज्य सरकारने ही धार्मिक स्थळे उघडण्यास १६ नोव्हेंबरला परवानगी दिली. तेव्हापासून शिर्डीच्या साई मंदिरात म्हणजेच गेल्या ७१ दिवसात १२ लाख २ हजार १६२ भाविकांनी दर्शन घेतले आहे. तर १० लाख ४५ हजार भाविकांनी साई प्रसादालयात भोजनाचा लाभ घेतला आहे. या काळात साई संस्थानला रोख स्वरूपात ३२ कोटी २ हजार १९१ रुपये देणगी प्राप्त झालेली आहे. याशिवाय ७९६ ग्रॅम सोने व १२ हजार १९२ ग्रॅम चांदी संस्थानला साईचरणी भाविकांनी अर्पण केली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वाचा:
साई संस्थानच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या भक्तनिवास सुविधेचा गेल्या ७१ दिवसांच्या कालावधीमध्ये जवळपास ३ लाख २० हजार ६३९ लाभ घेतला आहे. याशिवाय साई संस्थानच्या वतीने मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्यांना उदी देण्यात येते. ही उदी तब्बल १० लाख ३१ हजार साईभक्तांना मिळाली आहे, असेही त्यांनी सांगितले.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times