मुंबई: येत्या १ फेब्रुवारीपासून मुंबईतील उपनगरीय लोकल सेवा मर्यादित वेळेत सर्वांसाठी सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. तसं पत्र मध्य व पश्चिम रेल्वेला देण्यात आलं आहे. त्यामुळं एकीकडं सर्वसामान्यांना दिलासा मिळाला असतानाच रेल्वे प्रशासनानं घेतलेल्या भूमिकेमुळं संभ्रम वाढलं आहे. (Railway Administration on Resuming Mumbai Local Train)

वाचा:

राज्य सरकारनं दिलेलं पत्र आम्हाला मिळालं आहे. सर्वांसाठी लोकल सेवा सुरू करण्याच्या सरकारच्या मागणीबाबत रेल्वे बोर्डाला कळवण्यात येईल. बोर्डानं मान्यता दिल्यानंतर त्यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असं रेल्वे प्रशासनानं म्हटलं आहे. त्यामुळं लोकल ट्रेनमधून १ फेब्रुवारीपासूनच प्रवास करता येणार की आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला आहे.

वाचा:

ठराविक वेळेत मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरू करण्यासंदर्भात नुकतीच मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी बैठक झाली होती. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. सर्व प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरू करताना गर्दी होणार नाही व आरोग्याचे नियम पाळले जातील याची काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले होते. त्यानुसार, कोणत्या वेळेत सर्वसामान्यांना प्रवासाची परवानगी देता येईल, याचा सविस्तर तपशील सरकारनं रेल्वेला दिला आहे. त्यानंतर रेल्वे प्रशासनानं आता बोर्डाकडं बोट दाखवलं आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here