मुंबईः मुंबई महानगरपालिकेची निवडणुकीसाठी , भाजपसह अन्य पक्षांनीही आत्तापासून तयारी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेनेला पराभूत करण्यासाठी भाजपनं मोहिम आखण्यास सुरुवात केली असतानाच मनसेनंही शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

मुंबई महानगरपालिकेची निवडणूकीसाठी काही महिने उरले आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय टीका-टिप्पणीला सुरुवात झाली आहे. पालिकेतील कारभारावरुन मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला डिवचलं आहे. तर, युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनीही देशपांडे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

संदीप देशपांडे यांनी एक ट्विट करत महापालिकेच्या कारभारावर टीका केली आहे. विरप्पन ने जितकं लोकांना लुटलं नसेल त्या पेक्षा जास्त सत्ताधाऱ्यांनी महानगरपालिकेला लुटलं आहे. म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीत गँगचा एन्काउंटर करावाच लागेल, असं ट्विट संदीप देशपांडे यांनी केलं आहे. तर, संदीप देशपांडेंच्या या टीकेला उत्तर देताना वरुण सरदेसाई यांनी काही वृत्तपत्राची कात्रण पोस्ट ‘खरे विरप्पन कोण हे जनतेला चांगलेच माहिती आहे,’ असा टोला लगावला आहे.

संदीप देशपांडे यांनीही वरुण सरदेसाईंना प्रत्युत्तर देताना एक ट्विट केलं आहे. मी विरप्पनबद्दल बोललो होतो पण वरुण सरदेसाईंना का झोंबल माहित नाही, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here