मुंबई: दोन वर्षांपूर्वी पक्षाचा झेंडा बदलून हिंदुत्वाच्या दिशेनं वाटचाल करण्याचे संकेत दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता आणखी पुढचं पाऊल टाकणार आहे. मनसे अध्यक्ष हे अयोध्या दौरा करणार आहेत. राज यांचा हा दौरा झाल्यास मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय समीकरणं बदलण्याची चिन्हे आहेत.

वाचा:

आगामी महापालिका निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीनं मनसेची महत्त्वाची बैठक आज वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये झाली. मनसेच्या पुढील रणनीतीवर या बैठकीत चर्चा झाली. मनसेचे नेते यांनी बैठकीची माहिती पत्रकार परिषदेत दिली. राज ठाकरे हे १ ते ९ मार्च या कालावधीत अयोध्येचा दौरा करतील, असं नांदगावकर यांनी सांगितलं.

राज ठाकरे यांच्या करिष्म्यामुळं मनसे हा पक्ष सतत चर्चेत असला तरी संसदीय राजकारणात मनसेची ताकद खूपच कमी आहे. एक आमदार आणि जेमतेम काही नगरसेवक एवढीच मनसेची ताकद आहे. २०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचं कौतुक करणाऱ्या राज ठाकरे यांनी कालांतरानं मोदींविरोधात आघाडी उघडली होती. त्यानंतर अचानक त्यांनी हिंदुत्वाची कास धरली आणि मोदी विरोधही थांबवला. आता नव्या भूमिकेसह मनसे निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याच्या तयारीत आहे.

शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीची महाविकास आघाडी झाल्यानं राज्यातील राजकीय समीकरणं बरीच बदलली आहेत. सध्या प्रमुख विरोधी पक्ष असलेला भाजप महाविकास आघाडीशी टक्कर घेत आहे. या साऱ्यामध्ये मनसेला स्थान निर्माण करायचे आहे. मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक मनसेच्या भवितव्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आहे. या निवडणुकीत चांगलं यश मिळवणं मनसेसाठी आवश्यक आहे. हिंदुत्वाची भूमिका घेतल्यामुळं मनसे भाजपशी युती करणार का, अशी एक चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहे. राज यांच्या अयोध्या दौऱ्यामुळं युतीच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. त्यामुळंच या दौऱ्याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here