मुंबईः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अयोध्या दौरा करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. राज ठाकरे यांच्या दौऱ्यावर भाजपनं मोठं विधान केलं आहे. राज ठाकरेंच्या दौऱ्यामुळं हिंदुत्वाच्या भूमिकेला बळकटीच मिळेल, अशी प्रतिक्रिया भाजप नेते यांनी दिली आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे अयोध्येचा दौऱ्यावर जाणार असून १ ते ९ मार्च या कालावधीत ते दौरा करणार असल्याची, माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी भाष्य केलं आहे.

शिवसेनेत असतानाही राज ठाकरेंची हिंदुत्वाची भूमिका राहिलेली आहे. अयोध्येत जाऊन राज ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या भूमिकेला बळकटीच मिळेल, असं विधान प्रवीण दरेकर यांनी केलं आहे.

वाचाः

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजप आणि मनसे युती करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. यावरही दरेकर यांनी भाष्य केलं आहे. युती ही समविचारी घटकांची होत असतो. वैचारिक विचारधारावर होत असते. किंवा तशाप्रकारचं वातावरण असते. मला असं वाटतं हिंदुत्वाची भूमिका त्यांनी घेतली किंवा तशा प्रकारचे काही वातावरण आलं तर हिंदुत्ववादी विचारांचे पक्ष व संघटना एकत्र येण्यास निश्चितपणे चांगलं वातावरण निर्माण होईल, असं सूचक विधान त्यांनी केलं आहे. टीव्ही ९ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

वाचाः

मनसे – भाजप युती होणार का?
मुंबई महानगरपालिकेसाठी मनसे भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळं मनसे भाजपसोबत युती करणार असल्याचं जवळपास निश्चित झालं असल्याचं बोललं जात आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here