प्रेमविवाह झालेल्या या तरुणाची पत्नी कौटुंबिक वादामुळे माहेरी गेली आहे. याच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज आहे. अतुल रमेश पाटील (वय२६ जय भवानी, कॉलनी मेहरूण) असे मृत तरुणाचे नाव आहे.
अतुल पाटील हा तरूण पत्नी वर्षा आणि अर्णव या दोन वर्षांच्या मुलासह मेहरुण परिसरात राहत आहे. कौटुंबिक कारणावरून पत्नी वर्षा मुलाला घेवून माहेरी निघून गेल्या आहेत. दोघांनी तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. अतुलचे सिंधी कॉलनीतील संतचोखामेळा वसतीगृहासमोर भक्ती नावाचे मेडीकल दुकान चालवतो.
आज सकाळी नैराश्येतून ६ वाजेच्यासुमारास अतुल पाटील याने राहत्या खोलीत दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघकीला आले आहे. अतुलने गुरूवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास आपल्या मोबाईलच्या व्हॉटसॲपच्या ‘बाय’ असे स्टेटस ठेवले होते. दरम्यान मित्र आकाश मांडोळे याने घरी सकाळी घरी येऊन पाहिले तर अतुलने गळफास घेतला होता.
याघटनेची माहिती एमआयडीसी पोलीसांना देण्यात आली. अतुलने आत्महत्या केल्याची माहिती काका शांताराम माणिक पाटील यांनी कळविल्यानंतर त्यांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेतली. वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रविण पाटील यांच्या खबरीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times