मुंबईः राज्यात आज ५६ जणांचा करोनामुळं मृत्यू झाला आहे. तर, दिवसभरात २ हजार ७७१ नवीन रुग्णांची भर पडली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यात करोना संसर्गाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून करोनाच्या रोजच्या आकडेवारीत चढ उतार होताना दिसत आहे. गेले काही दिवस करोना रुग्ण बरे होण्याचा आकडा वाढत होता. तर, गेल्या दोन दिवसांपासून करोना बाधितांचा आकडा पुन्हा वाढला आहे. तसंच, करोना मृतांचा आकडाही काही प्रमाणात वाढल्यानं चिंता वाढली आहे. आज राज्यात ५६ बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं राज्यात आजपर्यंत ५१ हजारपर्यंत करोना बळींचा आकडा पोहोचला आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर २. ५२ टक्के इतका झाला आहे.

गेल्या २४ तासांत २ हजार ७७१ रुग्णांची भर पडली असून आजपर्यंत करोना बाधितांच्या रुग्णांची एकूण संख्या २० लाख २१ हजार १८४ इतकी झाली आहे. तर, आज दिवसभरात २ हजार ६१३ रुग्ण बरे झाले आहेत. तर, आत्तापर्यंत १९ लाख २५ हजार ८०० रुग्णांनी करोनाची लढाई यशस्विरीत्या जिंकली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५, २८ टक्के इतके झाले आहे.

अॅक्टिव्ह रुग्ण घटले
राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढत असताना अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होत आहे. हा राज्यासाठी मोठा दिलासा आहे. सध्या राज्यात ४३ हजार १४७ अॅक्टिव्ह रुग्ण असून मुंबईत ५ हजार ४१७ सक्रीय रुग्ण आहेत. तर, ठाण्यात ७ हजार ६५४, पुण्यात सर्वाधिक १३ हजार २४४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here