वाचा:
जळगाव जिल्ह्यातील येथील मालती नेहते या ८२ वर्षीय वृद्ध महिलेला करोना संसर्गाची लागण झाली होती. या महीलेस उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच ही वृद्ध महिला बेपत्ता झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने तिच्या नातेवाईकांना कळवले होते. यानंतर वृद्धेचे नातू यांनी याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर तब्बल आठ दिवसांनी दि. १० जून २०२० रोजी मालती नेहते यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत शासकीय रुग्णालयातील स्वच्छतागृहात आढळून आला होता. या घटनेने केवळ जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेले रुग्णालयाचे अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक, वृद्ध महिला बेपत्ता झाली तेव्हा कर्तव्यावर असलेले वैद्यकीय अधिकारी, नर्स यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
वाचा:
या संदर्भात लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या तसेच कमलाबाई देविदास भिडे व रफिक तडवी यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून या घटनेला जबाबदार प्रशासनाला शासन व्हावे, कोविड रुग्णांच्या उपचारासंदर्भात खासगी व शासकीय रुग्णसेवा यात तातडीने सुधारणा करून मार्गदर्शक सूचना दिल्या जाव्यात व मालतीबाई यांच्या वारसांना नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी न्यायालयाकडे दाद मागितली होती.
महिलेच्या वारसांना ५ लाख देण्याचे आदेश
याबाबत खंडपीठापुढे सुनावणी होऊन, राज्यशासनाने घटनेच्या आर्टिकल २१ चे उल्लंघन झाले म्हणून मालतीबाई नेहते यांच्या वारसांना ५ लाख रुपये नुकसानभरपाई निकालापासून ४ महिन्यांत द्यावी असे आदेश खंडपीठाने दिले आहेत. चौकशीबाबत नियुक्त तीन सदस्यीय समिती तसेच जिल्हाधिकारी जळगाव यांनी दाखल केलेल्या चौकशी अहवालानुसार आढळून आलेल्या दोषींवर राज्याच्या मुख्य सचिवांनी त्वरित कार्यवाही करावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. हा निकाल औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती श्रीकांत डी. कुलकर्णी व एस. व्ही. गंगापूरवाला यांनी दिला आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. श्रीमती गायत्री सिंग तसेच अंकित कुलकर्णी यांनी काम पाहीले.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times