वाचा:
दिल्लीतील इस्रायली दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटाची माहिती मिळताच महाराष्ट्र सरकारनेही अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत. विशेषत: मुंबईच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला आहे व पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही उणीव राहू नये, यासाठी खबरदारी बाळगण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री यांनी राज्याचे गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्याशी चर्चा केली व राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबई, पुण्यासह राज्यात सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले. याबाबत अजित पवार यांनी ट्वीटरच्या माध्यमातून माहिती दिली. राज्यातील जननेतेही सतर्क राहून आपल्या आजूबाजूला संशयास्पद वस्तू अथवा संशयास्पद हालचाली आढळून आल्यास पोलिसांना तात्काळ कळवावे, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.
वाचा:
सरकारच्या सूचनांनुसार मुंबई पोलिसांनी संपूर्ण शहरात अॅलर्ट जारी केला आहे. त्याचवेळी शहरातील सर्व प्रमुख ठिकाणी बंदोबस्त वाढण्यात आला आहे, असे मुंबई पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलानेही (सीआयएसएफ) सर्व विमानतळे, महत्त्वाची आस्थापने आणि शासकीय इमारतींसाठी अॅलर्ट जारी केला आहे.
हा दहशतवादी हल्ला?
दिल्लीत इस्रायलच्या दूतावासाबाहेर आयईडी स्फोट झाल्यानंतर या घटनेचा तातडीने तपास सुरू करण्यात आला आहे. या स्फोटात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील भागात हा स्फोट घडवण्यात आल्याने सर्व यंत्रणा हादरल्या आहेत. कुणीतरी दहशत पसरवण्यासाठी हा खोडसाळपणा केला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असला तरी सर्व शक्यता तपासल्या जात आहेत. दुसरीकडे इस्रायलचे अधिकारी सातत्याने भारताशी संपर्कात आहेत. इस्रायलने हा दहशतवादी हल्ला असल्याची भीती व्यक्त केली आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times