नवी दिल्ली/ तेल अवीव: दिल्लीतील दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटाचे पडसाद आता इस्रायलमध्ये ( israel embassy in delhi ) उमटले आहेत. इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही दहशतवादी घटना असल्याचं म्हटले आहं. खळबळ उडवून देण्यासाठी कोणीतरी हे काम केलं आहे, असा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. दरम्यान, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी इस्त्रायलचे परराष्ट्रमंत्री गाबी आश्केनजी यांच्याशी संपर्क साधला. इस्त्रायलाच्या सर्व राजदुतांना पूर्ण सुरक्षा देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. या प्रकरणाची चौकशी केली जात असून दोषींना सोडलं जाणार नाही, असं जयशंकर यांनी त्यांना सांगितलं.

दिल्लीचे पोलिस आयुक्त घटनास्थळी

दिल्लीचे पोलिस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव ( ) यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या विशेष विभागाकडून याची चौकशी सुरू आहे. आताच्या घडीला यापेक्षा अधिक काही सांगता येणार नाही, असं एस.एन. श्रीवास्तव म्हणाले. दरम्यान, स्फोटानंतर फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेकटरीची टीम घटनास्थळी लगेचच पोहोचली.

इस्त्रायली संस्थांची सुरक्षा वाढवली

दिल्लीतील स्फोटाच्या घटनेसंदर्भात परराष्ट्रमंत्री गबी अश्केनजी यांना सतत अपडेट दिली जात आहे. त्यांनी सर्व आवश्यक सुरक्षा उपाय करण्याची सूचना केली आहे. तसंच सर्व देशातील इस्त्रायली दूतावासांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या स्फोटात कोणालाही दुखापत झाली नाही. भारतीय अधिकारी या घटनेचा तपास करत आहेत आणि इस्त्रायली अधिकारीही भारताच्या संपर्कात आहेत, असं इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं.

काय म्हणाले दिल्ली पोलिस?

अत्यंत कमी तीव्रतेचा आयईडी स्फोट होता. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. जवळपास पार्क केलेल्या तीन वाहनांच्या काचा फोडून कोणत्याही मालमत्तेचं नुकसान झालेलं नाही. प्राथमिक तपासणीत हा प्रकार खळबळ उडवून देण्यासाठी कोणीतरी ही खोडी केल्याचं दिसून येतंय, असं पोलिसांचं म्हणणं आहे. घटनास्थळापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर ‘बीटिंग रिट्रीट’चा कार्यक्रम सुरू होता.

२०१२ मध्ये इस्रायली राजदुतावर झाला हातो हल्ला

इस्रायलच्या दूतावासाबाहेर आज झालेल्या आयईडी स्फोटाने २०१२ च्या घटनेची आठवण झाली. इस्त्रायलच्या एका राजदुताची कार पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ उडवण्यात आली होती. राजदूताची गाडी सिग्नलवर उभी होती तेव्हा मोटारसायकलवर बसलेल्या हल्लेखोरांनी कारवर स्फोटकं लावली होती. ते गेल्यानंतर काही सेकंदात कारचा स्फोट झाला. यात कारमध्ये बसलेल्या इस्त्रायली राजदुताची पत्नी येहोशुआ कोरेन या गंभीर जखमी झाल्या होत्या.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here