मुंबई: मुंबई येथील येथे कार्यरत असलेल्या एका तरुण वैज्ञानिकाने निवासस्थानी गळफास लावून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. (३८) असे या वैज्ञानिकाचे नाव असून कौटुंबिक वादातून त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ( BARC Latest News )

वाचा:

अणुशक्तीनगरमधील आकाशगंगा इमारतीमध्ये अनुज हे पत्नी आणि मुलांसह वास्तव्यास होता. गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास अनुज यांनी बेडरूममध्ये जाऊन टॉवेलच्या साहाय्याने पंख्याला गळफास लावून घेतला. बराच वेळ दरवाजा न उघडल्याने पत्नीने पाहिले त्यावेळेस अनुज हे गळफास लावलेल्या स्थितीत आढळले. त्यांना तत्काळ बीएआरसी येथील रुग्णालयात नेण्यात आले मात्र दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले.

वाचा:

याबाबतची माहीती मिळताच घटनास्थळी पोहोचले. प्राथमिक चौकशीत अनुज यांचे सकाळी ९ वाजताच्या सुमारास पत्नीसोबत भांडण झाले होते. मुलांना खायला देण्यावरून वाद झाल्यानंतर अनुज बेडरूम गेले आणि त्यांनी गळफास लावून घेतला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here