आईवडिलांमध्ये भांडणे झाल्यानंतर मुलगी प्रत्येक वेळी आईची बाजू घेते, याचा राग मनात ठेवून वडिलांनी मुलीच्या डोक्यात स्वयंपाकाचा तवा मारल्याची घटना येथे घडली. या घटनेत १७ वर्षीय मुलीच्या डोक्याला दुखापत झाली आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार मुलीच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित मुलीच्या आईवडिलांची नेहमीच भांडणे होतात. मात्र, भांडण झाल्यानंतर मुलगी प्रत्येक वेळी आईची बाजू घेते. याचा राग वडिलांच्या मनात होता. सोमवारी (२७ जानेवारी) वडिलांची आईसोबत किरकोळ भांडणे झाली होती. त्या वेळी मुलगी स्वयंपाक करीत होती. मात्र, वडिलांनी मागच्या भांडणाच्या वेळी मुलीने आईची बाजू घेतल्याचा राग होता. त्यामुळे वडिलांनी मुलीला रागारागाने बोलण्यास सुरुवात केली; तसेच रागाच्या भरात त्यांनी मुलीच्या डोक्यात स्वयंपाकाचा तवा मारला. यात मुलगी जखमी झाली आहे. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस तपास करीत आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
It’s really great. Thank you for providing a quality article. There is something you might be interested in. Do you know casinosite ? If you have more questions, please come to my site and check it out!