नवी दिल्लीः शेतकरी आंदोलनादरम्यान ( ) शुक्रवारी ( ) झाला. स्थानिक नागरिक आणि शेतकरी यांच्यात दगडफेक झाली. यावेळी अलिपूर एसएचओवरही शेतकरी आंदोलकाने तलवारीने हल्ला केला. या घटनेप्रकरणी पोलिसांनी ४४ जणांना अटक केली आहे. यामध्ये अलिपूर एसएचओवर तलवारीने हल्ला करणाऱ्या आरोपीचाही समावेश आहे. सिंघू सीमेवरील दुपारच्या घटनेनंतर संध्याकाळी उशिरा संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांनी ३० जानेवारीला सद्भावना दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. मोर्चाचे नेते या दिवशी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत उपोषण करतील.

सिंघू सीमेवर शुक्रवारी दुपारी १ च्या सुमारास नरेलाहून काही नागरिक आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचले होते. त्यांनी घोषणाबाजी करत शेतकर्‍यांना सीमा रिकामी करण्याची मागणी केली. शेतकरी आंदोलनामुळे अनेकांचे व्यवसाय ठप्प पडले आहेत. दीड ते दोनपर्यंत हे लोक शेतकऱ्यांच्या तंबूपर्यंत पोहोचले आणि त्यांनी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वस्तूंची तोडफोड केली. यानंतर शेतकरी आणि नागरिकांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली. दोन्ही बाजूंनी दगडफेकही झाली.

परिस्थितीवर नियंत्रण मिळवताना ५ पोलिस जखमी

पोलिसांनी आंदोलक शेतकरी आणि नागरिकांमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. पण परिस्थिती बिघडत असल्याचं पाहून लाठीमार करत पोलिसांनी अश्रुधुराचे नळकांडे फोडले. या घटनेत ५ पोलिस जखमी झाले. एका शेतकरी आंदोलकाने तलवारीच्या हल्ल्यात अलीपूर पोलिस स्टेशनचे एसएचओ प्रदीप पालीवाल हे देखील जखमी झाले. या हिंसाचारानंतर हरयाणा सरकारने उद्या संध्याकाळी ५ वाजेपर्यंत खबरदारी म्हणून १७ जिल्ह्यातील इंटरनेट सेवांवर बंदी घातली आहे. यावेळी फक्त कॉलिंग सेवा सुरू राहतील.

टिकरी सीमेवर शेतकर्‍यांविरोधात आंदोलन

टिकरी सीमेवरही आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी नागरिकांनी विरोधात शेतकऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली आणि सीमा रिकामी करण्याची मागणी केली. २६ जानेवारीला लाल किल्ल्याच्या तटबंदीवर झेंडा लावण्याच्या घटनेचा ते निषेध करत होते. त्यांच्या हातात फलक होते. राष्ट्रध्वजाचा अपमान देश सहन करणार नाही, असं त्यावर लिहिलेलं होतं. पण तिथे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. पोलिसांनी खबरदारी म्हणून बॅरिकेड्स आणखी बळकट केली आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here