पुणे: ‘शेतकऱ्यांवर देशद्रोहाचे खटले दाखल करून आंदोलन चिरडले जात आहे. आपण अस्वस्थ झाले पाहिजे, असा काळ आहे. केंद्रातील हिटलरशाहीप्रमाणे वागत आहे. आपण लोकशाहीत आहोत का,’ अशी घणाघाती टीका महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी शुक्रवारी केली. ( )

वाचा:

महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे स्वातंत्र्य सैनिक अॅड. रावसाहेब शिंदे यांच्या स्मृतिनिमित्त आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. थोरात यांच्या हस्ते आरोग्य मंत्री , ज्येष्ठ कवयित्री आणि कृषी अभ्यासक विलास शिंदे यांना ‘रावसाहेब शिंदे स्मृती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, डॉ. राजीव रावसाहेब शिंदे, सभेचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी होते.

वाचा:

‘शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवण्याचे प्रकार पाहून अण्णासाहेब शिंदे आणि रावसाहेब शिंदे प्रचंड अस्वस्थ झाले असते. दिल्लीतील स्थिती पाहून आपण अस्वस्थ होण्याचा काळ आहे,’ असे थोरात यांनी सांगितले. गुजराथी म्हणाले, ‘जगात काही देशांनी अणू दिला, चीनने विषाणू दिला तर भारताने लसरूपी सहिष्णू वृत्ती दिली आहे. साथीच्या आजाराची तीव्रता पाहता अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रावर आठ टक्के तरतूद आवश्यक आहे.’ सभेचे अध्यक्ष उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष रवींद्र डोमाळे यांनी आभार मानले.

वाचा:

विरोधी विचारांना देशद्रोहाचे रूप!

‘अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य कोणी कोणाला उचलून देण्याची गोष्ट नाही. लेखकांवर-कलाकारांवर अघोषित बंदी आली आहे. समाजाला लेखन स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती निरर्थक वाटू लागली आहे. विरोधी विचारांना देशद्रोहाचे रूप दिले जात आहे. राजधर्माच्या नावाखाली धार्मिक हिंस्रपणा वाढत आहे,’ अशा शब्दांत कवयित्री अनुराधा पाटील यांनी सामाजिक परिस्थितीवर बोट ठेवले. ‘सामान्यांच्या जगण्याचा संकोच करणाऱ्या वृत्ती वाढत असल्याने जगणे अवघड होत आहे. लोकशाहीचे सर्व फायदे घेऊन हुकूमशाही राबवण्याचे जुनेच प्रकार पुन्हा पुन्हा सुरू आहेत. आपण म्हणू तेवढीच लोकशाही आणि इतरांच्या बाबतीतल्या अपमानजनक विधानांचा अनुभव आपण घेत आहोत. सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्तींची आणि संस्थांची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. शहरांची नावे बदलून लोकांच्या आयुष्यात फरक पडेल का, यावरून लोकांचे मत विचारात घेतले जात नाही,’ अशी टीका त्यांनी केली.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here