आमदार गुर्जर यांनी भाजपची प्रतिमा मलिन करण्यासाठी शेतकऱ्यांना चिथावले. यापूर्वीही लोणीच्या आमदाराने पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी विरोधी नेत्यांसमवेत विधानसभेबाहेर धरणे आंदोलन केलं होतं. राकेश टिकैत यांनी भाजपचे दोन्ही आमदार नंद किशोर गुर्जर आणि सुनील शर्मा यांच्यावर गुंडगिरीचा आरोप केला होता, असं लोणी भाजपच्या अध्यक्ष रंजीता धामा असं म्हणाल्या.
यामुळेच राकेश टिकैत पुन्हा धरणे आंदोलनाला बसले. पण आपण गाझीपूर सीमेवर गेलोच नाही, असा दावा लोणीचे आमदार नंद किशोर गुर्जर करत आहेत. तसंच २६ जानेवारीच्या हिंसाचाराच्या घटनेनंतर राकेश टिकैत यांच्यासह योगेंद्र यादव यांच्यासारख्या शेतकरी नेत्यांना फाशी देण्याची मागणी करणारं त्यांचं एक पत्र व्हायरल होतं आहे. राकेश टिकैत याआधी शांततेत शरण येण्याची तयारी दर्शवली होती. पण आमदार नंद किशोर गुर्जर आंदोलनस्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी पोलिसांना शरण न जाण्याचा निर्णय घेतला, असं आता लोणी भाजपच्या अध्यक्ष रंजीता धामा यांनी राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रात लिहिलं आहे.
टिकैत पोलिसांना शरण येण्यास तयार असताना गाझीपूर सीमेवर आंदोलनाच्या ठिकाणी ५००-७०० आंदोलक होते. पण आमदार नंद किशोर यांनी जाणीवपूर्वक त्याचं रुपांतर हजारोंच्या गर्दीत केले. आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार नंद किशोर गुर्जर यांना समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढवायची आहे. म्हणूनच ते सरकारला पोखरण्याचा कट सतत रचत आले आहेत, असं रंजीता धामा यांनी पत्रात लिहिलंय.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times